लंडन - भारतीय बँकाचे पैसे बुडवून इंग्लंडमध्ये पळून गेलेला विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणास ब्रिटनकडून मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, मल्ल्याने ब्रिटन सरकारच्या या आदेशाविरोधात न्यायालयात अपील केली होती. दरम्यान, प्रत्यार्पणाविरोधात विजय मल्ल्याने केलेली याचिका लंडन न्यायालयाकडून फेटाळण्यात आली आहे. यामुळे हे मोदी सरकार आणि सीबीआयचे मोठे यश मानले जात आहे.
-
UK Court rejected on April 5 the plea of Vijay Mallya against his extradition order. (File pic) pic.twitter.com/ag2mVpM7ZX
— ANI (@ANI) April 8, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">UK Court rejected on April 5 the plea of Vijay Mallya against his extradition order. (File pic) pic.twitter.com/ag2mVpM7ZX
— ANI (@ANI) April 8, 2019UK Court rejected on April 5 the plea of Vijay Mallya against his extradition order. (File pic) pic.twitter.com/ag2mVpM7ZX
— ANI (@ANI) April 8, 2019
पैशांची अफरातफर आणि बँकांची फसवणूक केल्याप्रकरणी मल्ल्याला प्रत्यार्पणाचे आदेश ब्रिटनच्या गृह मंत्रालयाने दिले होते. लंडनच्या वेस्टमिनिस्टर मॅजिस्ट्रेटच्या न्यायालयाने १० डिसेंबर २०१८ ला मल्ल्याला भारतीय न्यायालयांना उत्तर द्यावे लागेल, असे म्हटले होते. त्यानंतर ब्रिटनचे गृहमंत्री साजिद जावीद यांच्याकडून मल्ल्याच्या प्रत्यार्पणास मंजुरी देण्यात आली होती. मात्र, विजय मल्ल्याने ब्रिटेन सरकारच्या निर्णयाविरोधात अपील केली होती. यामुळे आता माल्ल्याच्या मुसक्या आवळून त्याला काही दिवसांतच भारतात आणले जाण्याची शक्यता आहे.