ETV Bharat / international

युक्रेनियन बंडखोरांशी संबंध मजबूत करून पुढे जातोय रशिया - Order to conduct peace campaign

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी 'लुगान्स्क पीपल्स रिपब्लिक (Lugansk Peoples Republic )' आणि 'डोनेस्तक पीपल्स रिपब्लिक ( Donetsk Peoples Republic )' यांना स्वतंत्र आणि सार्वभौम राज्य म्हणून मान्यता देणाऱ्या दोन आदेशांवर स्वाक्षरी केली आहे. त्यानंतर येथे बख्तरबंद वाहनेही दिसली आहेत.

RUSSIA
RUSSIA
author img

By

Published : Feb 22, 2022, 7:54 PM IST

मॉस्को : रशियाने युक्रेनमधील दोन प्रदेश ताब्यात घेण्यासाठी वेगाने पावले उचलली आहेत ( Russia moved quickly ). त्यांच्या स्वातंत्र्याच्या मान्यतेनंतर पाश्चात्य सरकारांना आव्हान देण्यासाठी कायद्यासोबतच तेथे सैनिकही तैनात करण्यात आले आहेत ( Deployment of troops ). रशिया लवकरच संसदेत नवीन बील आणण्याच्या तयारीत आहे. ज्याच्या माध्यमातून रशियन सैनिकांना युक्रेनच्या आतपर्यंत पोहचण्यासाठी रस्ता मोकळा होऊ शकतो. जसे की अमेरिका आणि त्याच्या सहयोगींना भीती होती.

कागदपत्रांवर स्वाक्षरी झाल्यानंतर लगेचच बख्तरबंद वाहनांचे काफिले फुटीरतावादी-नियंत्रित भागात फिरताना दिसले ( Seen wandering in separatist-controlled areas ). मात्र तो रशियाचा होता की नाही हे स्पष्ट झाले नाही. डिक्रीवर स्वाक्षरी केल्यानंतर, पुतिन यांनी संघर्षग्रस्त पूर्वेकडील भागात "शांतता अभियान" चालवण्याचे आदेश दिले, ज्यामुळे ते लवकरच सीमा ओलांडून कीवमध्ये जातील अशी भीती निर्माण केली. सध्या, युक्रेनच्या सीमेवर 150,000 हून अधिक रशियन सैन्याने वेढलेले ( Surrounded by Russian troops ) आहे. पुतिन यांच्या घोषणेवर तात्काळ प्रतिक्रिया देताना, युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की ( Ukrainian President Volodymyr Zhelensky ) यांनी घोषित केले की 'आम्ही घाबरत नाही आणि कोणालाही काहीही देणार नाही.'

बंडखोर क्षेत्रांना स्वतंत्र राज्य म्हणून मान्यता देण्याचा सोमवारी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिनचा निर्णय ( President Vladimir Putin decision ) जवळपास आठ वर्ष जुन्या फुटीरतावादी संघर्षाला अनुसरतो. ज्यामध्ये 14,000 हून अधिक लोक मारले गेले होते. डॉनबासचा पूर्वेकडील औद्योगिक परिसर उद्ध्वस्त झाला होता. पुतीन यांच्या नवीन निर्णयाचा जगभरातील अनेक देशांनी निषेध केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.