लंडन - अधिक वेळ काम करणार्या कर्मचाऱ्यांमुळे कंपन्यांना आर्थिक नफा मिळतो. भारतासारख्या विकसनशिल देशात, जिथे मानवसंसाधनांची कमी नाही, अनेक विदेशी कंपन्या आयटी, वाहननिर्मिती सारखे उद्योग थाटत आहेत. त्यांचे औद्योगिक उद्दिष्ट त्यातून साध्य होत आहे. परंतु, अतिरिक्त तास काम करणे म्हणजे प्रत्यक्षात पर्यावरणासाठी हानीकारक आहे.
"कामाची पर्यावरणीय मर्यादा: कार्बन उत्सर्जन, कार्बन बजेट आणि कार्य वेळ" या शोध प्रबंधात संशोधक फिलिप फ्रे यांनी कामाचे तास कमी करण्याच्या कल्पनेवर चर्चा केली आहे. त्यांच्या मते, कामाचे तास कमी करणे पर्यावरणासाठी हानीकारक असलेल्या ग्रीनहाऊस गॅसचे उत्सर्जन कमी करू शकते. त्यासोबतच, कर्मचार्यांची उत्पादकता वाढवण्यातही यामुळे मदत होईल.
हेही वाचा - सेल्फी काढण्याच्या नादात हंपी जागतिक वारसा स्थळाची नासधूस, एकजण अटकेत
अधिक वेळ काम करण्ऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कंपन्या जास्त तास चालू राहतात. त्यामुळे, अधिक ग्रीनहाऊस गॅस वातावरणात उत्सर्जित केले जातात. कामाचे तास कमी केल्यास ग्रीनहाऊस गॅसचे उत्सर्जन कमी होण्यास मदत मिळेल. फ्रे यांच्या मते, कामाच्या तासात एक टक्का घट केल्यास पर्यावरणासाठी हानीकारक वायुंच्या उत्सर्जनात 0.8 टक्क्यांनी घट होऊ शकते.
कामाचे दिवस जास्त असल्याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावरही होतो. कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळा कमी केल्यास त्यांचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहिल. ज्यामुळे त्यांना अधिक चांगले नेतृत्व करता येईल, असेही फ्रे यांच्या अभ्यासातून समोर आले आहे.