ETV Bharat / international

बनावट लसींचा धोका : कोविड-19 लसी संघटित गुन्ह्यांचे लक्ष्य बनू शकतात, इंटरपोलचा अलर्ट - interpol global alert of fake covid 19 vaccine

'कोविड-19 च्या अनेक लसी मंजुरी आणि जगभरात वितरण करण्याच्या टप्प्याजवळ आहेत. त्यांच्या पुरवठा साखळ्यांची सुरक्षितता निश्चित करणे आणि बनावट उत्पादने विकणार्‍या बेकायदेशीर वेबसाइट्सची ओळख करणे आवश्यक असेल,' ते म्हणाले. इंटरपोलने बुधवारी ऑरेंज नोटिशीसह जारी केलेल्या निवेदनात 'कोविड -19 आणि फ्लूचे बनावट प्रकार, त्यांची चोरी आणि बेकायदेशीर जाहिराती' यामागे संभाव्य गुन्हेगारी कृत्ये करणारे असल्याचे सांगितले.

बनावट लसींचा धोका
बनावट लसींचा धोका
author img

By

Published : Dec 3, 2020, 6:10 PM IST

ल्योन (फ्रान्स) - इंटरपोलने आपल्या 194 सदस्य देशांमध्ये कायद्यांची अंमलबजावणी करणार्‍या संस्थांना जागतिक 'अलर्ट' जारी केला आहे. संघटित गुन्हेगारी नेटवर्कद्वारे कोविड-19 ची लस 'फिजिकली' आणि ऑनलाईन दोन्ही पातळ्यांवर लक्ष्य केली जाऊ शकते, असा इशारा इंटरपोलने दिला आहे.

इंटरपोलने बुधवारी ऑरेंज नोटिशीसह जारी केलेल्या निवेदनात 'कोविड -19 आणि फ्लूचे बनावट प्रकार, त्यांची चोरी आणि बेकायदेशीर जाहिराती' यामागे संभाव्य गुन्हेगारी कृत्ये करणारे असल्याचे सांगितले.

कोविड-19 लसी संघटित गुन्ह्यांचे लक्ष्य बनू शकतात, इंटरपोलचा अलर्ट

यामध्ये बनावट लसींची जाहिरात, विक्री आणि बेकायदेशीररीत्या प्रशासन करणे अशा गुन्ह्यांचा समावेश आहे.

'कोविड-19 च्या अनेक लसी मंजुरी आणि जगभरात वितरण करण्याच्या टप्प्याजवळ आहेत. त्यांच्या पुरवठा साखळ्यांची सुरक्षितता निश्चित करणे आणि बनावट उत्पादने विकणार्‍या बेकायदेशीर वेबसाइट्सची ओळख करणे आवश्यक असेल,' ते म्हणाले.

'लोकांची सुरक्षा आणि विविध समुदायांचे कल्याण निश्चित करण्यासाठी कायदा अंमलबजावणी आणि आरोग्य नियामक संस्था यांच्यातील समन्वय महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल,' असे इंटरपोलने सांगितले.

हेही वाचा - पाकिस्तानच्या आर्थिक स्थिरतेसाठी एडीबीने केले 30 कोटी डॉलर्सचे कर्ज मंजूर

'सरकार ही लस आणण्याची आणि वापरण्याची तयारी करत असताना गुन्हेगारी संघटना या लसींच्या पुरवठा साखळीत घुसखोरी करण्याचा विचार करीत आहेत. गुन्हेगारी नेटवर्क लोकांना बनावट वेबसाइट देखील उपलब्ध करतात. यांच्याद्वारे ते लोकांना लक्ष्य करतात. यामुळे लोकांच्या आरोग्याला आणि त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो,' असे इंटरपोलचे सरचिटणीस जर्गेन स्टॉक म्हणाले.

'कोविड-19 लस संबंधित सर्व गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी करणारी संस्था अधिकाधिक तयार असणे अत्यावश्यक आहे. म्हणूनच इंटरपोलने हा जागतिक इशारा दिला आहे,' असे जर्गेन पुढे म्हणाले.

कोविडशी संबंधित फसवणूकीत वाढ होत असल्याचे पाहून इंटरपोलने वैद्यकीय उपकरणे किंवा औषधांचा ऑनलाइन शोध घेताना लोकांना विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

इंटरपोलच्या सायबर क्राइम युनिटद्वारे केलेल्या विश्लेषणामध्ये असे दिसून आले आहे की, ऑनलाइन फार्मसीशी संबंधित तीन हजार वेबसाइट्सपैकी 1 हजार 700 वेबसाईटसना सायबर धोका आहे. ऑनलाईन घोटाळे टाळण्यासाठी जागरुक राहणे आवश्यक आहे. म्हणून कोविड-19 विषयी नवीन आरोग्य सल्ला घेण्यासाठी लोक नेहमीच त्यांचे राष्ट्रीय आरोग्य अधिकारी किंवा जागतिक आरोग्य संघटना वेबसाइट तपासावी, असे सांगितले आहे.

हेही वाचा - कोविड-19 विषयी युएनजीएचे विशेष सत्र, 100 हून अधिक नेते करणार संबोधित

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.