नवी दिल्ली - पोर्तुगालचे अध्यक्ष मार्सेलो रिबेलो द सौसा चार दिवसीय भारताच्या दौऱयावर आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मार्सेलो रिबेलो द सौसा यांची भेट घेतली. यावेळी पत्रक जारी करत भारत-पोर्तुगालदरम्यान विविध क्षेत्रांमध्ये 14 करार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
पोर्तुगाल हा दक्षिण युरोपमधील महत्वपूर्ण देश आहे. गेल्या 15 वर्षामध्ये द्विपक्षीय संबंधात प्रगती झाली आहे. पोर्तुगाल आणि भारतदरम्यान असलेले द्विपक्षीय संबंध ऐतिहासिक आणि पुर्वपार आहेत. गुंतवणूक, वाहतूक, बंदरे, सांस्कृतिक, औद्योगिक शिक्षा, स्टार्टअप, पाणि-पर्यायवरण, रक्षा, विज्ञान आणि तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रामध्ये दोन्ही देशांनी प्रगती केली आहे. दहशतवाद हा संपूर्ण जगासाठी एक धोक असून तो त्याच्याशी लढण्यासाठी परस्पर सहकार्य वाढवावे लागेल, असे कोविंद म्हणाले.
पंतप्रधान मोदी, भारत सरकारने तसेच इथल्या लोकांनी माझे ज्या प्रकारे स्वागत केले. त्याने मी भारावून गेलो आहे. जगातील सत्ता संतुलन राखण्यासाठी नवी दिल्ली महत्वाची असल्याचे सौसा म्हणाले. तसेच संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीमध्ये भारताला (यूएनएससी) स्थायी जागा मिळण्यासाठी मार्सेलो रिबेलो द सौसा यांनी पाठिंबा दर्शविला आहे.
-
Portuguese President Marcelo Rebelo de Sousa: Namaste, I am deeply emotionally touched with your very warm reception not just the invitation but the reception that I have received. We feel that we live in a new era, in a long lasting friendship, that is facing future. https://t.co/sADzZTejA6 pic.twitter.com/0eU4f5tYcR
— ANI (@ANI) February 14, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Portuguese President Marcelo Rebelo de Sousa: Namaste, I am deeply emotionally touched with your very warm reception not just the invitation but the reception that I have received. We feel that we live in a new era, in a long lasting friendship, that is facing future. https://t.co/sADzZTejA6 pic.twitter.com/0eU4f5tYcR
— ANI (@ANI) February 14, 2020Portuguese President Marcelo Rebelo de Sousa: Namaste, I am deeply emotionally touched with your very warm reception not just the invitation but the reception that I have received. We feel that we live in a new era, in a long lasting friendship, that is facing future. https://t.co/sADzZTejA6 pic.twitter.com/0eU4f5tYcR
— ANI (@ANI) February 14, 2020
मार्सेलो रिबेलो द सौसा यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा केली. त्यामध्ये व्यापार आणि गुंतवणुकीवर भर देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टि्वट करुन उभय देशादरम्यान 14 करार झाल्याचे सांगितले. तसेच द्विपक्षीय सहकार्याच्या विस्तारावर व्यापक चर्चा झाल्याचे मोदी टि्वटमध्ये म्हणाले.