वॉशिंग्टन डी. सी - कोरोना विषाणूचे संकट सर्वच देशांपुढे अधिक गंभीर होत चालले आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. अद्यावयत आकडेवारीनुसार आत्तापर्यंत जगभरात 1 लाख 54 हजार 261 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
जगभरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 22 लाख 50 हजार 751 वर पोहोचली आहे. तर 1 लाख 54 हजार 261 जणांचा मृत्यू झाला आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे, 5लाख 71 हजार 145 लोक उपचारानंतर बरे झाले आहेत.अमेरिकेत कोरोना संकट दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे. देशभरात रुग्णांचा आकडा साडेसहा लाखांपर्यंत पोहचला आहे. त्यामुळे न्यूयॉर्क शहरात 15 मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे.
अमेरिकेत आत्तापर्यंत 7 लाख 10 हजार 21 कोरोनाबाधित असून 37 हजार 158 जणांचा मृत्यू झाला आहे. तर स्पेनमध्ये 1 लाख 90 हजार 839 कोरोनाबाधीत तर 20 हजार जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. त्यापाठोपाठ इटलीमध्ये 1 लाख 72 हजार 434 जण कोरोनाबाधित आहेत. तर 22 हजार 745 जणांचा बळी गेला आहे.
कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा आणि मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या महामारीवर लवकरात लवकर लस तयार करण्यासाठी जगभरातील वैज्ञानिक झपाटून काम करत आहेत. ऑस्ट्रेलियातील एक कंपनी आगामी काही आठवड्यात कोव्हिड - १९ च्या औषधीची मानवी ट्रायल घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनावरील लसीचा मानवी शरिरावर काय परिणाम होतो, हे यातून समजण्यास मदत होईल.