ETV Bharat / international

Global Covid-19 Tracker : जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या 16 लाखांच्या पुढे; एक लाख दगावले

जगभरामध्ये कोरोना विषाणूची बाधा तब्बल 16 लाख 99 हजार 931 जणांना झाली आहे. तर कोरोनामुळे 1 लाख 2 हजार 734 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये दिलासादायक बाब म्हणजे 3 लाख 76 हजार 327 जण उपचारानंतर पूर्णत: बरे झाले आहेत.

Global COVID-19 trackerGlobal COVID-19 tracker

author img

By

Published : Apr 11, 2020, 10:53 AM IST

जिनेव्हा - जगभरामध्ये कोरोनाविषाणूने थैमान घातले असून कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच चालली आहे. अद्ययावत आकडेवारीनुसार आत्तापर्यंत 16 लाख 99 हजार 631 नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोना विषाणूमुळे जागतिक आणिबाणी निर्माण झाली आहे.

Global COVID-19 tracker
जगभरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 16 लाखापेक्षा अधिक, तर 1 लाख दगावले

जगभरामध्ये कोरोना विषाणूची बाधा तब्बल 16 लाख 99 हजार 931 जणांना झाली आहे. तर कोरोनामुळे 1 लाख 2 हजार 734 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये दिलासादायक बाब म्हणजे 3 लाख 76 हजार 327 जण उपचारानंतर पूर्णत: बरे झाले आहेत.

अमेरिकेत गेल्या 24 तासांमध्ये कोरोनामुळे 2 हजार 108 लोक मरण पावले आहेत. एकूण मृत्यूचा आकडा 18 हजार 747 झाला आहे.स्पेनमध्ये गेल्या 24 तासांमध्ये 605 जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृताचा आकडा 15 हजार 800 वर गेला आहे. तर इटलीमध्ये 570 नवीन मृत्यूची नोंद झाली असून आतापर्यंत 18 हजार 800 जणांचा मृत्यू झाला आहे.

वृद्ध व्यक्तींचा किंवा आधीच एखाद्या आजाराने ग्रस्त असणाऱ्या नागरिकांचा सर्वात जास्त मृत्यू झाला आहे. वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी अनेक देशांनी संचारबंदी लागू केली असून नागरिकांना घरातच सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे. कोरोनावर लस शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असले तरी अजून लस तयार होण्याच वेळ लागणार आहे. कोरोनाच्या फैलावामुळे जागतिक व्यापार, पर्यटन, वाहतूक, उद्योगधंदे सर्व ठप्प झाले आहेत. आरोग्याची जागतिक आणिबाणी निर्माण झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.