ETV Bharat / international

कोरोनाचा सामना करण्यासाठी गरिबांवर लक्ष केंद्रित करा, आरोग्यसेवेत सुधारणा करा - संशोधक - कोरोनाचा सामना आरोग्यसेवा लंडन संशोधक

ब्रिटीश मेडिकल जर्नलच्या तीन संशोधकांनी लिहिलेल्या लेखात असे म्हटले आहे की, जगभरात फक्त कोविड-१९ लाच फक्त मोठा आजार मानला जातोय. पण देशांनी गरीब लोकांकडे जास्त लक्ष दिले पाहिजे. कारण ते लोक या रोगाला जास्त बळी पडतात. त्यासाठी त्यांची आरोग्यसुविधा सुधारली पाहिजे, म्हणजे मृत्यूचे प्रमाणही कमी होईल.

Focus on poor, improve overall healthcare to combat COVID-19: Researchers
कोरोनाचा सामना करण्यासाठी गरिबांवर लक्ष केंद्रित करा, आरोग्यसेवेत सुधारणा करा - संशोधक
author img

By

Published : Jun 14, 2020, 2:30 AM IST

लंडन (युके) : ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार सध्याचे संसर्गजन्य साथीचे रोग आणि दारिद्र्य यामुळेच कोविड-१९ हा आजार वादळाचे स्वरूप बनला आहे.

यात असे म्हटले आहे की, जगभरात फक्त कोविड-१९ लाच फक्त मोठा आजार मानला जातोय. पण कोविड-१९ अनेक गोष्टींवर अवलंबून आहे. त्याचे तंत्र समजून घ्यायला हवे. गरिबी आणि इतर संसर्गजन्य रोगाशी सामना करणारे लोक यांच्यासाठी कोविड-१९ जास्त घातक आहे. त्यांची प्रतिकार शक्ती सुधारणे, त्यांच्यासाठीची आरोग्यसेवा याकडे सरकारने लक्ष द्यायला हवे.

कोलंबिया मेलमॅन स्कुलच्या नीना श्र्वाॅल्बे, स्पार्क स्ट्रीटच्या सल्लागार सुसान्ना लेहतीमाकी आणि मेक्सिकोच्या नॅशनल ऑटोनाॅमस युनिव्हर्सिटीच्या जुहान पाब्लो गुटिरेज यांनी ही माहिती दिली आहे. लेखकांच्या मते स्थुलता, उच्च रक्तदाब आणि मधुमेह हे आजार असलेल्यांना कोरोना झाला तर तो जीवघेणा ठरू शकतो. शिवाय गरिबीमुळेही कोरोना संक्रमण वाढू शकते. कारण त्यांच्याकडे पोषक आहाराची कमतरता आणि त्यामुळे प्रतिकारशक्ती कमी असते.

अमेरिकेतून गोळा केलेला डेटा हे सिद्ध करतोय. तिथे कृष्णवर्णीय लोकांचा मृत्यू जास्त प्रमाणात होतो आहे. त्यांच्या एकूण लोकसंख्येच्या (१८ टक्के ) तुलनेत ३३ टक्के लोकांचा मृत्यू होत आहे.

लेखकांनी पुढे लिहिले आहे की, कोविड-१९ साठी लाॅकडाऊन, फिजिकल डिस्टन्सिंग सारखे उपाय सर्वत्र लागू केले आहेत. त्याचा परिणाम दुर्दैवाने गरिबांच्या आरोग्यसेवेवर पडत आहे. त्यांना अन्न न मिळणे, बेरोजगारी याला तोंड द्यावे लागते. त्यामुळे या समाजाच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो आणि मृत्यूचे प्रमाण वाढते.

कोविड-१९ या साथीच्या रोगाने जागतिक स्तरावर सगळ्या लोकसंख्येवरच लक्ष केंद्रित केले गेले. खरे तर कमजोर लोकांकडे जास्त लक्ष पुरवणे गरजेचे होते. लेखकांचे म्हणणे असे आहे, यामुळे संसाधनांचे वाटप चुकीचे होते.

या संकटाशी सामना करण्यासाठी लेखकांनी गरिबांना आर्थिक मदत (उदा. पैसे ट्रान्सफर करणे), चांगली आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हे उपाय सुचवले आहे. यामुळे या महामारीवर आपण नियंत्रण मिळवू शकतो.

हेही वाचा - चीन : 7 नवे कोरोना रुग्ण समोर आल्यानंतर बीजिंगमधील बाजारपेठ बंद

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.