ETV Bharat / international

ETV Bharat Exclusive : युक्रेनमध्ये मृत्यू झाालेल्या नवीनच्या मित्राचा 'ईटीव्ही भारत'सोबत संवाद, म्हणाला... - Lovekesh In Ukraine

युक्रेनमध्ये रशियाने केलेल्या हल्ल्यात कर्नाटकमधील ( Indian Student Died In Ukraine ) एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. यासंदर्भात 'ईटीव्ही भारत'ने युक्रेनमध्ये मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याच्या मित्राशी बातचीत ( Naveen Friend Talk To ETV Bharat ) करून तेथील परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केला.

ETV exclusive conversation with Lavkesh
ETV exclusive conversation with Lavkesh
author img

By

Published : Mar 1, 2022, 7:53 PM IST

चंदीगड ( पंजाब ) - युक्रेनमध्ये रशियाने केलेल्या हल्ल्यात कर्नाटकमधील ( Indian Student Died In Ukraine ) एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. यासंदर्भात 'ईटीव्ही भारत'ने युक्रेनमध्ये मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याच्या मित्राशी बातचीत ( Naveen Friend Talk To ETV Bharat ) करून तेथील परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केला. लवकेश ( Lovekesh In Ukraine ) असे या मुलाचे नाव असून तो पंजाबमधील भटिंडा ( Panjabi Student In Ukraine ) येथील मौर मंडीचा रहिवासी आहे. तो युक्रेनमध्ये शिकण्यासाठी गेला आहे. यावेळी बोलताना त्याने युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांची स्थिती अत्यंत दयनीय असल्याचे म्हटले.

लवकेशसोबत संवाद

काय म्हणाला लवकेश -

युक्रेनमध्ये राहणारा नवीनचा मित्र लवकेश याच्याशी 'ईटीव्ही भारत'ने खास बातचीत केली आहे. ज्यामध्ये त्याने सांगितले की, या भागात राहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची स्थिती अत्यंत दयनीय आहे. लवकेशने सांगितले की, आठवड्यापासून त्यांनी काहीही जेवलेले नाही. तसेच लवकेशने त्याचा वर्गमित्र नवीनचा मृत्यू कसा झाला हे देखील सांगितले. आपण लवकरच शहर सोडणार असल्याचे त्याने ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले. तसेच आम्हाला लवकरात लवकर परत आणण्याची मागणी त्याने भारत सरकारकडे केली आहे.

युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू -

युक्रेनमध्ये रशियाने केलेल्या हल्ल्यात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. युक्रेनमधील खार्किव येथे आज सकाळी झालेल्या मिसाईल हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ट्वीटकरुन याबाबत माहिती दिली आहे. तसेच मंत्रालय त्यांच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - Ukraine President Addressed European Parliament : 'आम्ही आमच्या भूमीसाठी आणि आमच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहोत आम्ही युक्रेनियन', संसदेत टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.