लंडन - ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी जालियानवाला बाग हत्याकांडाविषयी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. ब्रिटनच्या संसदेत बोलताना मे यांनी १९१९ साली भारतात इंग्रजांनी घडवून आणलेल्या जालियानवाला बाग हत्याकांडाविषयी दु:ख व्यक्त केले.
जे काही घडले त्याबद्दल आम्ही तीव्र दु:ख व्यक्त करतो, असे मे म्हणाल्या. जालियानवाला बाग हत्याकांडाला १०० वर्ष पूर्ण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर त्या बोलत होत्या.
जालियानवाला बाग हत्याकांडात इंग्रजांनी हजारो आंदोलकांवर अंदाधुंद गोळीबार केला होता. यात अनेकांना प्राण गमवावे लागले होते. १३ एप्रिल १९१९ रोजी ही घटना घडली होती. यापूर्वीही २०१३साली ब्रिटनचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरुन भारत दौऱयावर आले असताना त्यांनी ही घटना लाजिरवाणी असल्याचे म्हटले होते.