ETV Bharat / international

'या' विमान कंपनीतील बारा हजार कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार..? - ब्रिटिश एअरवेज कर्मचारी कपात

कोरोनामुळे जगभरात आर्थिक मंदी आली आहे. व्यापार बंद असल्यामुळे अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांची कपात करत आहे. कोरोनामुळे बंद पडलेल्या व्यवसायांपैकी सर्वात मोठा फटका हा विमान कंपन्यांना पडला आहे.

12,000 personnel could be axed at British Airways
'या' विमान कंपनीतील बारा हजार कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार..?
author img

By

Published : Apr 29, 2020, 11:36 AM IST

लंडन - कोरोनामुळे जगभरात आर्थिक मंदी आली आहे. व्यापार बंद असल्यामुळे अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांची कपात करत आहे. कोरोनामुळे बंद पडलेल्या व्यवसायांपैकी सर्वात मोठा फटका हा विमान कंपन्यांना पडला आहे.

यातच इंग्लंडच्या ब्रिटिश एअरवेज या कंपनीच्या तब्बल १२ हजार कर्मचाऱ्यांवरही टांगती तलवार आली आहे. आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी ब्रिटिश एअरवेजने आपल्या कामगार संघटनांना प्रस्तावित पुनर्रचना व रिडंडंसी प्रोग्रामबद्दल औपचारिकरित्या सूचित केले आहे.

याबाबत अद्याप अंतिम निर्णय झाला नसला, तरीही कंपनीच्या १२ हजार कर्मचाऱ्यांना आपली नोकरी गमवावी लागेल, असे चित्र सध्या दिसत आहे. ब्रिटिश एअरवेजची पॅरंट कंपनी असलेल्या आयएजी या संस्थेने याबाबत माहिती दिली.

इंग्लंडमध्ये आतापर्यंत कोरोनाचे १,६१,१४५ रुग्ण आढळून आले असून, देशात आतापर्यंत २१ हजारांहून अधिक नागरिकांचा कोरनामुळे मृत्यू झाला आहे.

हेही वाचा : Global COVID-19 Tracker: जगभरात ३१ लाख ३८ हजार बाधित, तर २ लाख १७ हजार ९८५ दगावले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.