ETV Bharat / international

पाहा व्हिडिओ: इंडोनेशियातील माऊंट सिनाबुंगमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक; 1 कि.मी. पर्यंत पसरली राख

इंडोनेशियामध्ये आज पहाटे ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. उत्तर सुमात्रा मधील माऊंट सिनाबुंग येथे हा ज्लावामुखीचा उद्रेक झाला. उद्रेकाच्या केंद्रबिंदूपासून 1 किलोमीटर परिसरात धूर आणि राख पसरली आहे. प्रशासनाने नागरिकांना उद्रेकाच्या 5 किलोमीटरच्या परिघात जाऊ नये, अशा सूचना दिल्या आहेत.

Indonesia's Sinabung volcano
माऊंट सिनाबुंगमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक
author img

By

Published : Aug 23, 2020, 4:03 PM IST

इंडोनेशिया- पश्चिम इंडोनेशियामध्ये आज पहाटे ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. उत्तर सुमात्रा मधील माऊंट सिनाबुंग येथे ज्लावामुखीचा उद्रेक झाला. उद्रेकाच्या केंद्रबिंदूपासून 1 किलोमीटर परिसरात धूर आणि राख पसरली आहे.

उत्तर सुमात्रा मधील माऊंट सिनाबुंग येथील ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर प्रशासन कडून नागरिकांना खबरदारी घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. मागील काही दिवसांपासून इंडोनेशियामध्ये ज्वालामुखी उद्रेकाच्या घटना वाढल्या आहेत, अशी माहिती इंडोनेशियातील वोल्कॅनोलॉजी जिओलॉजिकल हझार्ड मीटीगेशन सेंटरच्यावतीने सांगण्यात आले आहे.

माऊंट सिनाबुंगमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक

ज्वालामुखी उद्रेकाच्या परिसरापासून 5 किलोमीटरच्या बाहेर वास्तव्य करावे, अशा सूचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत. आजच्या ज्वालामुखी उद्रेकाचा विमान वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही. वारंवार होणाऱ्या ज्वालामुखीच्या घटनांमुळे मागील काही वर्षांमध्ये सिनाबुंग मधील 30 हजार रहिवाशांना गाव सोडून जावे लागले आहे. 2014 मध्ये झालेल्या उद्रेकामुळे 17 जणांनी जीव गमावला होता तर 2016 मध्ये 7 जणांचा मृत्यू झाला होता.

10 ऑगस्टला झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर माऊंट सिनाबुंगमध्ये 5 किमी परिसरात धूर आणि राख पसरली होती. त्यावेळी नागरिकांना उद्रेकाच्या 5 किलोमीटरच्या परिघात जाऊ नये, अशा सूचना प्रशासनाने दिल्या होत्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.