ETV Bharat / international

जपानमध्ये कोरोनाचे 2 हजार 502 नवे रुग्ण

author img

By

Published : Nov 27, 2020, 7:59 PM IST

जपानमध्ये 2 हजार 502 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यासह देशातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 40 हजार 288 वर पोहोचली. येथील आरोग्य मंत्रालय व स्थानिक प्रशासनाच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली आहे.

जपान कोरोना न्यूज
जपान कोरोना न्यूज

टोकियो - जपानमध्ये 2 हजार 502 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यासह देशातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 40 हजार 288 वर पोहोचली. येथील आरोग्य मंत्रालय व स्थानिक प्रशासनाच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली आहे.

टोकियोजवळील योकोहामा येथे अलगीकरणार ठेवलेल्या डायमंड प्रिन्सेस क्रूझ जहाजावरील 712 रुग्णांचा समावेश या आकडेवारीत करण्यात आलेला नाही.

हेही वाचा - ब्रिटनमध्ये 24 तासांत 696 मृत्यू, 5 मेपासूनची कोरोनाच्या बळींची सर्वाधिक आकडेवारी

जपानमध्ये न्यूमोनिया विषाणूमुळे आतापर्यंत 2 हजार 66 लोक मृत्यूमुखी पडले आहेत. तसेच, गुरुवारी 17 नवीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याचे कळवण्यात आले. यापैकी 13 मृत्यू डायमंड प्रिन्सेस क्रूझ शिपमध्ये झाले आहेत.

येथे सध्या 410 गंभीर आजारी रुग्ण आहेत. ते व्हेंटिलेटरवर किंवा अतिदक्षता विभागात दाखल आहेत, असे सिन्हुआ या वृत्तसंस्थेने आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने म्हटले आहे.

जपानमधील साथीच्या रोगाचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टोकियोमध्ये गुरुवारी 481 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राजधानीतील रुग्णांची संख्या 39 हजार 79 वर पोचली आहे. देशातील 47 प्रांतांमध्ये येथे सर्वाधिक प्रकरणे आढळली आहेत.

हेही वाचा - अमेरिकेत कोरोनाचे बळी 2.6 लाखांवर, मार्च 2021 पर्यंत 4.7 लाखांच्या पुढे जाण्याचा अंदाज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.