सेऊल - उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियादरम्यान रविवारी गोळीबार झाला. उत्तर कोरियाच्या सैन्याने दक्षिण कोरियाच्या सीमा रक्षक चौकीवर गोळीबार केला. दक्षिण कोरियाने त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी गोळीबाराच्या दौन फैरी झाडल्याचे, दक्षिण कोरियाचे जॉइंट चीफ ऑफ स्टाफ यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
दक्षिण कोरियामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, असे लष्कराने सांगितले. उत्तर कोरियाचे काही नुकसान झाले की नाही हे माहित नसल्याचे ते म्हणाले. दरम्यान प्योंगयांगच्या अधिकृत कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सीने या घटनेची माहिती दिलेली नाही. 2017 मध्ये शेवटच्या वेळी सीमेवर गोळीबार झाला होता. जेव्हा उत्तर कोरियाने दक्षिण कोरियामध्ये पळून जाणाऱया सैनिकांवर गोळ्या झाडल्या होत्या.
गेल्या काही दिवसांपासून उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांच्या तब्येतीबाबत अनेक गोष्टी समोर येत होत्या. त्यांच्या मृत्यू झाल्याच्या अफवाही पसरल्या होत्या. त्र, आता त्यांनी कार्यक्रमाल हजेरी लावल्याचे वृत्त समोर आले आहे. किम जोंग-उन हे तब्बल २० दिवसानंतर सार्वजनिक कार्यक्रमात दिसले. एका रासायनिक खत कारखान्याच्या उद्धाटनाला किम यांनी शुक्रवारी हजेरी लावली.