ETV Bharat / international

पाकिस्तानजवळ 125-250 ग्रॅमचे अणुबॉम्ब; पाकिस्तानी रेल्वेमंत्र्याचा खुलासा

काश्मीर प्रकरणावरून भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या स्थितीत 'पाकिस्तानकडे 125 ते 250 ग्रॅम वजनाचे अणुबॉम्ब आहेत. जे कोणत्याही लक्ष्य क्षेत्राचा नाश करण्यासाठी सक्षम आहेत', असा दावा पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद अहमद यांनी केला आहे.

पाकीस्तानजवळ 125-250 ग्रॅमचे अणुबॉम्ब; पाकीस्तानी रेल्वेमंत्र्याचा खुलासा
author img

By

Published : Sep 2, 2019, 11:15 PM IST

लाहोर - काश्मीर प्रकरणावरून भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या स्थितीत 'पाकिस्तानकडे 125 ते 250 ग्रॅम वजनाचे अणुबॉम्ब आहेत. जे कोणत्याही लक्ष्य क्षेत्राचा नाश करण्यासाठी सक्षम आहेत', असा दावा पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद अहमद यांनी केला आहे. पंजाब प्रांताच्या ननकाना साहिब येथे एका रेल्वे स्थानकाच्या इमारतीची पाहणी केल्यानंतर पत्रकारांसोबत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही काश्मिरच्या मुद्द्यावरून दोन अण्वस्त्रधारी शेजार्‍यांमध्ये युद्धाच्या शक्यतेविषयी वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते, दोन अण्वस्त्रधारी देशांमधे युद्ध झाल्यास ते शेवटचेच सिद्ध होईल असे नाही. म्हणून भारताने पाकिस्तानसोबत युद्धापासून वाचले पाहिजे.रशीद पुढे म्हणाले, पाकिस्तानवर युध्द लादल्यास भारत 22 भागात विभागला जाईल. भारताने चुकीच्या पद्धतीने परमाणू स्फोट करणे आणि काश्मिरचा विषेश दर्जा काढून घेणे अशा दोन चुका केल्या आहेत. कारण त्यांना विश्वास होता कग काश्मिरी त्यावर कुठलीच प्रतिक्रीया देणार नाहि.य

यापूर्वी, शेख रशीद 'भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध सुरू होईल' अशा वक्तव्यामुळे चर्चेचा विषय ठरले होते. ते म्हणाले होते की, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात युद्ध होऊ शकते. तसेच, दोन्ही देशांमधील हे शेवटचे युद्ध असेल.

Intro:Body:

news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.