ETV Bharat / international

कोरोना लसीकरण मोहिमेसाठी मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांनी केले मोदींचे अभिनंदन - मालदीव राष्ट्राध्यक्ष ट्विट

"पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकारचे या लसीकरण मोहिमेसाठी अभिनंदन. ही महामारी थांबवण्यात, आणि कोरोनावर विजय मिळवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल याबाबत मला विश्वास आहे. हा कोविड-१९चा शेवट ठरु शकतो" अशा आशयाचे ट्विट करत त्यांनी देशाचे अभिनंदन केले.

Maldives President congratulates PM Modi for COVID-19 vaccination drive
कोरोना लसीकरण मोहिमेसाठी मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांनी केले मोदींचे अभिनंदन
author img

By

Published : Jan 17, 2021, 8:38 PM IST

माले : मालदीवचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी रविवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. शनिवारी भारतात कोरोना लसीकरणाला सुरुवात करण्यात आली, त्याबाबत शुभेच्छा देत, त्यांनी ही महामारी लवकरच संपेल असा आपल्याला पूर्ण विश्वास वाटत असल्याचेही ट्विट करत म्हटले.

"पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकारचे या लसीकरण मोहिमेसाठी अभिनंदन. ही महामारी थांबवण्यात, आणि कोरोनावर विजय मिळवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल याबाबत मला विश्वास आहे. हा कोविड-१९चा शेवट ठरु शकतो" अशा आशयाचे ट्विट करत त्यांनी देशाचे अभिनंदन केले.

शनिवारी पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोरोना लसीकरण मोहिमेची सुरूवात केली. ही जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम असल्याचे म्हटले जात आहे. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात देशातील जवळपास तीन कोटी आरोग्य आणि सफाई कर्मचाऱ्यांना लस देण्याची घोषणा शनिवारी करण्यात आली.

कोव्हिशिल्डचे 1.1 कोटी आणि कोव्हॅक्सिनचे 55 लाख डोस

हैदराबादस्थित भारत बायोटेकने उत्पादित केलेल्या कोव्हिशिल्डचे 1.1 कोटी आणि कोव्हॅक्सिनचे 55 लाख डोस उपलब्ध करून देण्याचे केंद्राने आदेश दिले आहेत.

प्रति डोस किती रु.?

कोव्हिशिल्डची किंमत प्रति डोस २०० रुपये आहे. ३८.५ लाख डोसेससाठी २९५ रुपये प्रतिडोस आकारण्याची भारत बायोटेकची योजना आहे. तर उर्वरित १६.५ लाख डोसेस विनामूल्य दिले जाणार आहेत. दुसरीकडे, कोव्हॅक्सिनचा डोस २०६ रुपयांना उपलब्ध आहे.

कोणत्या राज्यांना किती?

राजस्थान, तामिळनाडू, दिल्ली, महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक, ओडिशा, उत्तर प्रदेश, आसाम, आंध्र प्रदेश आणि हरयाणा या राज्यांनी कोव्हॅक्सिनच्या वापरास परवानगी दिली आहे. यापैकी दहा राज्यांना यापूर्वीच कोव्हॅक्सिनचे २०,००० डोस मिळाले आहेत, तर आसामला आतापर्यंत १२, ००० डोस मिळाले आहेत.

हेही वाचा : कोरोनावरील लस अनिवार्य नाही, तर ऐच्छिक; दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.