वॉशिंग्टन डी.सी - अफगाणिस्तानवरून कतार गेलेल्या एका विमानाच्या लँडिंग गियरमध्ये आणि चाकांमध्ये मृतदेह आढळल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. सोमवारी काबूल विमानतळावर लँडिंग झाल्यानंतर नागरिकांनी विमानाला घेरले होते. देश सोडून जाण्यासाठी काही नागरिक विमानाच्या चाकेवर आणि लँडिंग गियरमध्ये बसले. तेव्हा परिस्थिती बिघडल्यानंतर सी-17 विमानाच्या वैमानिकाने उड्डान घेतले, असे हवाई दलाकडून जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
काबूल विमानतळावरील नागरिकांची अत्यंत भयावह स्थिती आहे. विमानतळावरील परिस्थितीचे अनेक व्हिडिओ आणि फोटोज सोशल माध्यमांवर व्हायरल झाले आहेत. अफगाणिस्तानमधील नागरिक आपला जीव वाचवण्यासाठी धडपड करत आहेत. मिळेल त्या मार्गानं ते देश सोडताना ते दिसत आहेत. काही जण काबूल विमानतळावरुन उड्डाण घेणाऱ्या विमानाच्या चाकाला लटकून बसल्याचे एका व्हायरल व्हिडिओतून दिसून आले होते. तसेच विमानाच्या चाकावर लटकलेल्या दोघांचा उंचावरुन पडून मृत्यू झाला होता.
अफगाणिस्तानमध्ये अराजकाता निर्माण झाली असून तालिबानी सरकार आले आहे. तालिबानच्या ताब्यात अफगाणिस्तान गेल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण तयार झालंय. तालिबानच्या जुलमी राजवटीत राहण्यापेक्षा देश सोडण्याचा विचार करत आहेत. काबूलमधून बाहेर जाणाऱ्या विमानांमध्ये बसण्यासाठी नागरिकांची झुंबंड उडाली आहेजो तो देश सोडण्यासाठी प्रयत्न करतोय. विमानतळावरील अफगाण नागिराकांची प्रचंड गर्दी झाल्यानं अमेरिकन लष्करानं हवेत गोळीबार केल्याचं समोर आलंय. अमेरिकेच्या लष्करानं केलेल्या गोळीबारामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, अमेरिकेनं काबूल विमानतळाचा ताबा घेतला आहे.
हेही वाचा - डिप्लोमॅट्स, दूतावासातील अधिकाऱ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही; तालिबानचे आश्वासन
हेही वाचा - आम्ही प्रत्येकाची माफी मागतो, सरकारी कर्मचाऱ्यांनी कर्तव्यावर रूजू व्हावे -तालिबान