काबूल - अफगाणिस्तानात काबूलमध्ये मंगळवारी झालेल्या स्फोटात पाच लोकांचा मृत्यू आणि दोन जण जखमी झाले. वृत्तसंस्था सिन्हुआच्या माहितीनुसार, पोलीस प्रवक्ते फरदौस फरामर्ज म्हणाले, 'डॉक्टरांना घेऊन जाणाऱ्या कारला या स्फोटात लक्ष्य करण्यात आले होते. डोगाबाद परिसरातील पोलीस जिल्हा 7 मध्ये ही घटना घडली.'
या डॉक्टरांनी अफगाणिस्तानातील मुख्य कारागृह असलेल्या पूल-ए-चरखी येथे काम केले आहे, अशी माहिती फरामर्ज यांनी दिली. या प्रकरणी तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा - काबूलमध्ये कार बॉम्बस्फोटात 9 जण ठार
अद्याप कोणत्याही गटाने या घटनेची जबाबदारी स्वीकारलेली नाही. मंगळवारी ही घटना अशा वेळी घडली आहे, जेव्हा 17 से 20 डिसेंबरदरम्यान देशभरात वेगवेगळ्या स्फोटांमध्ये 28 नागरिकांचा मृत्यू झाला, असा दावा देशाच्या गृहमंत्र्यांनी रविवारी केला होता.
हेही वाचा - बांग्लादेशात रेल्वे-बसची भीषण धडक, 12 जण ठार