काबूल - अफगाण सरकारच्या आकडेवारीनुसार असे दिसून आले आहे की, गेल्या महिन्यात सहा प्रांतातील सततच्या संघर्षामुळे तब्बल 18 हजार कुटुंबे विस्थापित झाली आहेत. ही सर्व कुटुंबे बागलान, कुंदुज, फराह, हेरात, घोर आणि उरुजगन या प्रांतांतील आहेत.
टोलो न्यूजच्या वृत्तानुसार, राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयाने शनिवारी एका निवेदनात म्हटले आहे की, सध्याचा हिंसाचार कायम राहिल्यास किंवा त्यात आणखी वाढ झाल्यास सहाय्य करणाऱ्या संस्था असुरक्षित भागातील असुरक्षित कुटुंबांपर्यंत पोहोचणार नाहीत.
हेही वाचा - अफगाणिस्तानच्या हेल्मंडमध्ये 60 दहशतवाद्यांचा खात्मा
मंत्रालयाचे प्रवक्ते अहमद तमीम अझीमी म्हणाले, 'जर परिस्थिती अधिकच वाईट झाली आणि हिंसाचार कायम राहिल्यास मदत आणि बचाव प्रयत्नांमध्ये गंभीर आव्हाने उभी राहतील.'
मंत्रालयाच्या मते, मागील वर्षात सुमारे 45 हजार कुटुंबे विस्थापित झाली होती. या संघर्षामुळे आणखी 25 हजार कुटुंबे विस्थापित होतील, अशी भीती मंत्रालयाने व्यक्त केली आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, कुंदुज शहरातील एका शाळेत 100 विस्थापित लोक निवारागृहामध्ये राहत आहेत.
हेही वाचा - 2020 मध्ये सौदी शहरांवर 75 बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागले : हौथी बंडखोर