ETV Bharat / international

पाकिस्तानविरोधात दिल्लीतील अफगाण वंशाच्या नागरिकांचे आंदोलन; लहान मुलांचाही सहभाग - मोहम्मद इलियास

अफगाणिस्तानच्या परिस्थितीसाठी पाकिस्तानला दोष देत अफगाण नागरिकांनी पाकिस्तानचा निषेध केला. अफगाण वंशाच्या मुलांनीही यात भाग घेतला आणि जगातील सर्व देशांना अफगाणिस्तानला मदत करण्याचे आवाहन केले.

children of afghan origin also participated in demonstration against pakistan
पाकिस्तानविरोधात दिल्लीतील अफगाण वंशाच्या नागरिकांचे आंदोलन
author img

By

Published : Sep 11, 2021, 10:21 AM IST

नवी दिल्ली - अफगाणिस्तानमधील बिघडलेल्या परिस्थितीसाठी पाकिस्तानला दोष देत भारतातील अफगाण वंशाच्या लोकांनी दिल्लीच्या चाणक्यपुरी येथे पाकिस्तानविरोधात निदर्शने केली. यावेळी अफगाण वंशाच्या लोकांसह, लहान मुले देखील आंदोलनात सहभागी झाली होती. मूळ अफगाण असलेल्या मात्र, भारतात वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी जगातील सर्व देशांना अफगाणिस्तानला मदत करण्याचे आवाहन केले.

पाकिस्तानविरोधात दिल्लीतील अफगाण वंशाच्या नागरिकांचे आंदोलन

अफगाण नागरिकांनी पाकिस्तानविरोधात राग व्यक्त केला. अफगानिस्तानच्या स्थितीला फक्त पाकिस्तान जबाबदार आहे. तालिबानने पाकिस्तानच्या मदतीने अफगाणिस्तान ताब्यात घेतले आहे, असे नागरिक म्हणाले. अफगाणिस्तानात तालिबानचा ताबा मिळाल्यानंतर भारतात राहणारे अफगाणी वंशाचे लोक सतत तालिबानच्या विरोधात आंदोलन करताना दिसतात. मी माझ्या देशासाठी लढा देत असल्याचे पाकिस्तानविरुद्धच्या आंदोलनात सहभागी असलेला 8 वर्षीय मोहम्मद इलियास म्हणाला.

हेही वाचा - 10 सप्टेंबर राशीभविष्य : गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी 'हे' शुभकार्ये घडतील; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.