ETV Bharat / international

‘ब्लॅक लाईव्हज् मॅटर’ रॅलीवर बंदी आणण्याची ऑस्ट्रेलियन पोलिसांची मागणी - Gladys Berijiklian

जॉर्ज फ्लॉईड यांच्या मृत्यनंतर अमेरिकेमध्ये आंदोलन सुरु आहेत. या आंदोलनाप्रती एकता व्यक्त करण्यासाठी आणि जॉर्ज यांच्या मृत्यूचा निषेध दर्शवण्यासाठी ऑस्ट्रेलियन नागरिकांनी शनिवारी रॅली काढण्याचा निर्णय घेतला.

ब्लॅक लाईव्हज् मॅटर
ब्लॅक लाईव्हज् मॅटर
author img

By

Published : Jun 5, 2020, 4:55 PM IST

सिडनी - जॉर्ज फ्लॉईड यांच्या मृत्यूनंतर अमेरिकेमध्ये आंदोलन सुरू आहेत. या आंदोलनाप्रती एकता व्यक्त करण्यासाठी आणि जॉर्ज यांच्या मृत्यूचा निषेध दर्शवण्यासाठी ऑस्ट्रेलियन नागरिकांनी शनिवारी रॅली काढण्याचा निर्णय घेतला. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर न्यू साउथ वेल्स पोलिसांनी याला विरोध दर्शवला आहे. याप्रकरणी सरकारने सर्वोच्च न्यायालयात हा निषेध 'बेकायदेशीर समजला' पाहिजे अशी मागणी केली आहे.

‘ब्लॅक लाईव्हज् मॅटर’ आंदोलन केल्यास लोक एकत्र जमा होतील. त्यामुळे आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो, असे पोलिसांनी म्हटले आहे. जवळपास 10 हजार लोकांनी या रॅलीमध्ये सहभाग घेण्याची इच्छा दर्शवली. तसेच रॅली आयोजकांनी सर्वांना फेस मास्क आणि वैयक्तिक संरक्षक उपकरणे (पीपीई) घालण्याची व इतरांपासून अंतर ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सुरुवातील रॅलीला परवानगी देण्यात आली होती. मात्र, सहभाग घेण्याची संख्या वाढल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रॅलीला नकार देण्यात येत आहे. आंदोलक रॅलीमध्ये सोशल डिस्टन्स पाळतील याची खात्री नाही. यामुळे आंदोलनकर्त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

आयोजकांनी हा कार्यक्रम रद्द करावा, अशी विनंती पोलिसांनी केली आहे. तसेच मेलबर्नमधील पोलिसांनी लोकांना नियोजित निषेधार्थ आंदोलनात उपस्थित न राहण्याचे आवाहन केले आहे. तथापि, ब्रिस्बेन आणि एडलेडमध्ये निषेधाला पोलिसांनी मान्यता दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.