ETV Bharat / international

मातृभूमीच्या रक्षणासाठी अर्मेनियन पंतप्रधानांच्या पत्नी जाणार सीमेवर! - अ‌ॅना हाकोब्यान लष्करी प्रशिक्षण

गेल्या महिनाभरापासून अर्मेनिया आणि अझरबैजान देशांमध्ये युद्ध सुरू आहे. आपल्या मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी आता अर्मेनियाच्या पंतप्रधानांच्या पत्नीही लष्करी प्रशिक्षण घेऊन सीमेवर जाणार आहेत.

Armenia PM's wife starts combat training to defend Karabakh border
अर्मेनियाच्या पंतप्रधानांच्या पत्नी सीमेवर जाण्यासाठी सज्ज!
author img

By

Published : Oct 29, 2020, 6:52 AM IST

येरवान : अर्मेनिया देशाचे पंतप्रधान निकोल पशिन्यान यांच्या पत्नी अ‌ॅना हाकोब्यान या आपल्या देशाचे संरक्षण करण्यासाठी आता सीमेवर जाणार आहेत. लष्करी प्रशिक्षण घेणाऱ्या १३ महिलांच्या पथकामध्ये त्यांचा सहभाग असणार आहे. या प्रशिक्षणानंतर त्या नागोर्नो-काराबाख सीमेवर जातील.

फेसबुकवरुन दिली माहिती..

हाकोब्यान यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवरुन याबाबत माहिती दिली. "१३ महिलांचे एक पथक -ज्यामध्ये आपणही असणार आहे- हे लवकरच अर्मेनियाच्या लष्करामध्ये सहभागी होत आहे. अझरबैजानच्या सैन्याला लढा देण्यासाठी नागोर्नो-काराबाख सीमेवर आम्ही जाणार आहोत" अशा आशयाची पोस्ट त्यांनी केली होती.

Armenia PM's wife starts combat training to defend Karabakh border
अ‌ॅना हाकोब्यान यांची फेसबुक पोस्ट

"२७ ऑक्टोबरपासून आमचे प्रशिक्षण सुरू होईल, आणि आम्ही लवकरच सीमेवर जाऊ. आपल्या मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी अर्मेनियाचे लष्कर काय करु शकते, हे जगाला दाखवण्याची वेळ आली आहे." असेही त्या पुढे म्हणाल्या.

अर्मेनिया-अझरबैजान युद्ध..

यावर्षी जुलैमध्ये अर्मेनिया आणि अझरबैजान देशांच्या सीमेवर चकमकींमध्ये वाढ झाली होती. त्यानंतर २७ सप्टेंबरला दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू झाले. नागोर्नो-काराबाख प्रांतामध्ये गेल्या महिन्याभरापासून हे युद्ध सुरू आहे.

हेही वाचा : आशिया खंडात अमेरिकेचा चीनला दणका, भारत, श्रीलंकेनंतर पॉम्पिओ मालदीव दौऱ्यावर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.