हेल्मंड (अफगाणिस्तान) - दक्षिण अफगाणिस्तानच्या हेल्मंड प्रांतात शनिवारी रस्त्याकडेला झालेल्या बॉम्ब स्फोटात राष्ट्रीय सुरक्षेचा स्थानिक संचालक ठार झाल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली. हेल्मंडच्या नावा जिल्ह्यात शनिवारी सकाळी 7 च्या सुमारास (15:00 GMT) हा स्फोट झाला.
या स्फोटात हेल्मंडच्या नावा जिल्ह्याच्या राष्ट्रीय सुरक्षा संचलनालयाचे प्रमुख आणि एक सैनिक ठार झाला.
हेही वाचा - मध्य आफ्रिकी प्रजासत्ताकमधील सशस्त्र हल्ल्यात 3 संयुक्त राष्ट्र शांततासैनिक ठार, 2 जखमी
अफगाणच्या संरक्षण मंत्रालयाने शनिवारी सांगितले की, देशाच्या हेल्मंड व कंदहार प्रांतांमध्ये अफगाण वायुसेनेच्या (एएएफ) हल्ल्यात तब्बल 66 दहशतवादी ठार झाले आणि 18 इतर जखमी झाले.
सैन्याच्या म्हणण्यानुसार, एएएफच्या हल्ल्यात चार अल-कायदा (दहशतवादी गट, रशियामध्ये बंदी घातलेला) आणि 26 तालिबानी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आणि गेल्या दोन दिवसांत हेल्मंड च्या नावा जिल्ह्यात सहा जण जखमी झाले. शुक्रवारी प्रांताच्या नाद-ए-अली जिल्ह्यात अफगाण सुरक्षा दलावर हल्ल्याचा कट रचणाऱ्या आणखी सात दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्यात आले.
हेही वाचा - सीरियात मध्यरात्री झालेल्या इस्रायली हल्ल्यात 6 सैनिक ठार