काबूल - अफगाणिस्तानातील हेल्मण्ड प्रांतात अफगाण सैन्याने टाकलेल्या छाप्यात दोन कमांडरांसह 25 तालिबानी दहशतवादी ठार झाले. तर, इतर 8 जखमी झाले. सैन्यातर्फे ही माहिती दिली.
वृत्तसंस्था सिन्हुआनुसार, सैन्याच्या कोअर 215 मेवंदने एका निवेदनात म्हटले आहे की, 'अफगाण राष्ट्रीय संरक्षण आणि सुरक्षा दला'ने (ओआरएसएफ) शुक्रवारी हेल्मण्डच्या नवा-ए-बरकजाई येथे एक कारवाई केली. यामध्ये हे दहशतवादी ठार झाले.
हेही वाचा - चीनमध्ये खाणीतील अपघातात 23 कामगार ठार, एकाला वाचवण्यात यश
या भागातल्या दहशतवाद्यांच्या कारवाया रोखण्याच्या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली. येथील दहशतवाद्यांनी एआरएसएफच्या मोक्याच्या ठिकाणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
एनडीएसएफने काबूलच्या नैऋत्येकडे टाकलेल्या छाप्यामध्ये 6 दहशतवादी तळ आणि त्यांच्या 25 संरक्षण चौक्या नष्ट करण्यात आल्या आणि चार इम्प्रोवाइज्ड बॉम्ब निकामी केले.
तालिबानी दहशतवादी गटांनी या छाप्याबद्दल अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
हेही वाचा - थायलंडमध्ये वादळासह मुसळधार पावसामुळे पूरस्थिती, 13 जण ठार