ETV Bharat / international

इराणवरील निर्बंधांप्रकरणी अध्यक्ष रुहानी यांच्याकडून अमेरिकेचा निषेध - इराणचे अध्यक्ष हसन रुहानी

इराणला कोरोना महामारीचा मुकाबला करण्यासाठी एप्रिलमध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (आयएमएफ) 5 अब्ज डॉलर्सचे कर्ज मिळणार होते, यातही अमेरिकेने आडकाठी घातल्यावरून अध्यक्ष रूहानी यांनी अमेरिकेचा निषेध नोंदवला.

इराण
इराण
author img

By

Published : Sep 27, 2020, 6:37 PM IST

Updated : Sep 27, 2020, 7:00 PM IST

तेहरान - इराणचे अध्यक्ष हसन रूहानी यांनी अमेरिकेने लादलेल्या अमानुष निर्बंधांबद्दल टीका केली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर तेहरानविरोधात कुरघोड्या करण्यामागे व्हाईट हाऊसच जबाबदार आहे. शनिवारी कोरोनाबाबत देशातील आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय मुख्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीनंतर रूहानी माध्यमांशी बोलत होते.

अमेरिकेने बेकायदेशीर आणि अमानुषपणे, दहशतवादी कारवायांद्वारे आमच्या देशात औषध आणि अन्नाचा होणारा पुरवठा थांबवला. व्हाईट हाऊसमध्ये अशा बर्बरपणाचे लोक आम्ही कधी पाहिले नाहीत. ते खूपच अत्याचारी आहेत. इराणला कोरोना महामारीचा मुकाबला करण्यासाठी एप्रिलमध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (आयएमएफ) 5 अब्ज डॉलर्सचे कर्ज मिळणार होते, यातही त्यांनी आडकाठी घातल्यावरून अध्यक्ष रूहानी यांनी अमेरिकेचा निषेध नोंदवला.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर संयुक्त राष्ट्रांनी २०१५ ला काढून घेतलेले शस्त्र निर्बंध एकतर्फी लागू केले आहेत. इराण आणि इराणशी संबंधित व्यक्ती आणि संस्थांवरही ट्रम्प यांनी निर्बंध लादले आहेत. इराणने शांतता कराराचा भंग केल्याचा आरोप करत अमेरिकेने ही कारवाई केली आहे. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी अध्यक्ष हसन रूहानी यांनी अमेरिकेवर टीका करत त्यांच्या धोरणांचा निषेध केला.

हेही वाचा - अमेरिकन लोकांना हाँगकाँगच्या अधिकाऱ्यांशी व्यवहार करण्यास बंदी

Last Updated : Sep 27, 2020, 7:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.