ETV Bharat / international

कोरोना: UN मध्येही १२ एप्रिलपर्यंत 'वर्क फ्रॉम होम'; न्यूयॉर्कमध्ये कोरोना बाधितांची संख्या १५४ - कोरोना आजार

आरोग्य महासंचालक आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांनी हा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून कार्यलयात न येता कर्मचारी घरूनच काम करणार आहेत.

संयुक्त राष्ट्रासंघ
संयुक्त राष्ट्रासंघ
author img

By

Published : Mar 14, 2020, 8:13 AM IST

न्यूयॉर्क - कोरोना विषाणू जगभरातील १०० पेक्षा जास्त देशांमध्ये पसरला आहे. हा जागतिक साथीचा आजार नियंत्रणात आणण्यासाठी सरकारी पातळीवरून सर्वोतपरी प्रयत्न सुरु आहेत. कोरोना विषाणूमुळे संयुक्त राष्ट्रसंघानेही आपल्या कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' म्हणजेच घरून काम करण्याचे आदेश दिले आहेत. 12 एप्रिलपर्यंत आता संयुक्त राष्ट्रसंघाचे कामकाज मुख्यतहा: व्हिडिओ कॉल, ईमेल आणि फोनवरून चालणार आहे.

शुक्रवारी संयुक्त राष्ट्र कार्यालयात काम करत असेलल्या एका राजनैतिक अधिकाऱ्याला कोरना झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सावधानता बाळगण्यात येत आहे. अमेरिकेमध्ये ४२१ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर एकट्या न्युयॉर्क शहरात १५४ जण कोरोना बाधित आहेत.

कार्यालयीन कामकाजाबाबतचा निर्णय संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांनी घेतला आहे. आरोग्य महासंचालक आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर गुटेरस यांनी हा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून कार्यलयात न येता कर्मचारी घरूनच काम करणार आहे. मात्र, अती महत्त्वाचे काम असेल तर कार्यालयात जावे लागणार आहे, असे संयुक्त राष्ट्राचे प्रवक्त्यांनी माहिती दिली.

कार्यालय आणि परिसरात कमीत कमी नागरिक असतील, यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत. संयुक्त राष्ट्राचे 'चिल्ड्रन्स फंड' हे कार्यलयही बंद ठेवण्यात आले आहे. तेथील तीन कर्मचारी आजारी पडल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.