जेनेसविले (व्हिन्कोन्सिन) - राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मतदारांना आपल्या बाजूने झुकवण्यासाठी 'भीती'च्या अस्त्राचा वापर करणे सुरू केले आहे. मिशिगन आणि विस्कॉन्सिन या दोन मध्य-पश्चिमेकडील राज्यांमधील मतदारांशी संवाद साधताना त्यांनी त्यांचे डाव्या विचारसरणीचे प्रतिस्पर्धी बायडेन 'अमेरिकन जीवनशैली नष्ट' करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला.
2016 च्या निवडणुकीत ट्रम्प यांना या दोन राज्याxत विजय मिळाला होता. तो त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला होता. मात्र, या निवडणुकीत ही दोन राज्ये त्यांच्या हातून निसटतात की काय, अशी परिस्थिती आहे. ही राज्ये दोलायमान स्थितीतील (स्विंग स्टेट्स) राज्यांपैकी आहेत. या राज्यांमधील निकाल निवडणुकीचे भवितव्य ठरवण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे ट्रम्प यांना त्यावर पकड राखणे आवश्यक आहे. यामुळे येथे एकामागोमाग एक होणाऱ्या रॅलींमध्ये डाव्या विचारसरणीचे आपले प्रतिस्पर्धी अमेरिकेचा विजय आणि अमेरिकन मूल्ये पुसून टाकण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप ट्रम्प यांच्याकडून केला जात आहे. यामुळे कोणताही तार्किक आधार न देता डेमॉक्रेटिक पक्षाचे बायडेन येथील समाजाला संकटात टाकतील, असा दावा ट्रम्प वारंवार करत आहेत.
हेही वाचा - फ्रान्स : मोहम्मद पैगंबराचे व्यंगचित्र वर्गात दाखविल्यानं शिक्षकाचा शिरच्छेद
देशभरात केल्या जाणाऱ्या मतदानपूर्व चाचण्यांमध्ये ट्रम्प यांच्याविरोधात परिस्थिती असल्याचे दिसत आहे. तर, बायडेन आघाडीवर असल्याचे अनेक चाचण्या आणि स्थल परिस्थितीजन्य सर्वेक्षणांमधून (battleground surveys) समोर येत आहे. ट्रम्प यांनी प्रचार मोहिमेनंतर बायडेन यांच्याविरोधात अशा प्रकारच्या टिप्पणी करण्यास सुरुवात केली आहे. तसेच, त्यांनी मध्य-पश्चिमेत टीव्ही जाहिरातींवर खर्च होणारा पैसाही त्यांनी फ्लोरिडा, उत्तर कॅरोलिना, अॅरिझोना, जॉर्जिया आणि पेन्सिल्व्हानिया या राज्यांमधील जाहिरातींकडे वळवला आहे.
ट्रम्प यांनी, त्यांच्याकडे पाठ फिरवणाऱ्या मतदारांना रोखण्यासाठी डेमोक्रॅटिक नेते आणि संबंधित व्यक्ती अमेरिका-विरोधी कट्टरतावादी असल्याचे चित्र रंगवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तसेच, रिपब्लिकन पक्षाला मतदान करणे आणि या पक्षाला पुन्हा सत्तेत आणणे, हे आपले नैतिक कर्तव्य असल्याचे लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न चालवला आहे. तसेच, बायडेन यांच्या निवडून येण्याने देशात टाळेबंदी होईल, कोविड - 19 वरील लस येण्यास उशीर होईल आणि कोरोना प्रादुर्भावाची स्थिती आणखी वाढेल, मिशिगन राज्याचे शरणार्थी छावणीत रुपांतर होईल, यामुळे देशाच्या इतिहासात प्रथमच निराशाजन्य स्थिती निर्माण होईल, अशी वक्तव्ये करून नागरिकांना भीती घालण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
मी हरलो तर काय होईल, याची तुम्ही कल्पना करू शकता का? अमेरिकन राजकारणाच्या इतिहासातील सर्वांत खराब उमेदवाराकडून मला हार पत्करावी लागली तर काय? मी काय करावे? अशा प्रकारची वक्तव्ये ट्रम्प यांनी केली आहेत. तसेच, ते कोरोना विषाणू प्रादुर्भावाची भीती असतानाही एकामागोमाग एक प्रचारसभा ते घेतच आहेत. याचाच परिणाम म्हणून त्यांना कोरोनाचा संसर्गही झाला आणि अनेक दिवस रुग्णालयात रहावे लागले.
हेही वाचा - रक्तरंजित संघर्षानंतर अर्मेनिया अझरबैजानमध्ये नव्याने शस्त्रसंधी