वॉशिंग्टन - चीन-भारताच्या सीमारेषेच्या स्थितीवर अमेरिका जवळून देखरेख करत आहे. ही समस्या शांततामय मार्गाने सुटावी, अशी आशा असल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते म्हणाले, की चीनच्या कुरापतीपणाला थांबविण्यासाठी त्यांच्याविरोधात उभे ठाकणे हा एकमेव पर्याय आहे. चीनचा कम्युनिस्ट पक्ष हा त्यांच्या लोकांना आणि शेजाऱ्यांवर दबाव आणत असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मायकल पॉम्पेओ म्हणाले, की बीजिंगकडून सातत्याने देशात व विदेशात आक्रमकपणा दाखविला जात आहे. तैवानच्या सामद्रधुनी ते शिनजियांग, दक्षिण चीन समुद्र ते हिमालय, सायबर विश्व ते आंतरराष्ट्रीय संस्था अशा पद्धतीने आम्ही चीनच्या कम्युनिस्ट पक्षाशी सामना करत आहोत.
हेही वाचा-नियंत्रण रेषेवरील सैन्याला चीनने आवर घालावा - भारतीय परराष्ट्र मंत्रालय
भारत-चीन सीमेवर दिवसेंदिवस तणाव वाढताना दिसत आहे. दोन्ही देशांच्या लष्करी कमांडर स्तरावर चर्चा करून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येत असतानाच भारत आणि चिनी सैनिकांमध्ये २९ आणि ३० ऑगस्टच्या रात्री पँगाँग लेकच्या दक्षिणेस चिनी सैन्याच्या हालचाली अचानक वाढल्या होत्या. मात्र, भारतीय सैन्याने त्यांचे घुसखोरीचे प्रयत्न रोखल्याची माहिती आहे. पँगाँग लेक परिसरात दोन्ही देशाच्या सैनिकांमध्ये संघर्ष झाला. त्यामध्ये भारतीय सैनिक सुरक्षीत राहिले आहेत. गेल्या १५ जूनला झालेल्या चकमकीनंतर ही सीमारेषेनजीकची दुसरी मोठी घटना आहे.
हेही वाचा-भारत-चीन सीमावाद : आज पार पडणार ब्रिगेड कमांडर लेव्हलची बैठक