वॉशिंग्टन : उत्तर कोरियाकडे सुमारे ६० अणुबॉम्ब असल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. यासोबतच, सुमारे पाच हजार टनांचे केमिकल वेपन्सही कोरियाकडे असल्याचे अमेरिकेच्या लष्कराने म्हटले आहेत.
'नॉर्थ कोरिया टॅक्टिक्स' या आपल्या अहवालात अमेरिकेच्या लष्कराने याबाबत माहिती दिली आहे. उत्तर कोरियाकडे २० ते ६० अणुबॉम्ब आहेत. तसेच, वर्षाला सहा नवे बॉम्ब बनवण्याची क्षमताही त्यांच्याकडे आहे, असे या अहवालात म्हटले आहे. यासोबतच, २० वेगवेगळ्या प्रकारचे २.५ ते ५ टन केमिकल वेपन्सही कोरियाकडे आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात केमिकल वेपन्स असणारा तो जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे.
यासोबतच या अहवालामध्ये बायोलॉजिकल वेपन्सबाबतही माहिती दिली आहे. अँथरॅक्स किंवा स्मॉलपॉक्स हे आजार या वेपन्सच्या माध्यमातून परसवले जाऊ शकतात. उत्तर कोरिया हे दक्षिण कोरिया, अमेरिका आणि जपान यांविरोधात हे वेपन्स वापरू शकते, असे या अहवालात म्हटले आहे. केवळ एक किलो अँथरॅक्स ५० हजार लोकांना मारण्यासाठी पुरेसे आहे, अशी माहिती या अहवालात दिली आहे.
तसेच उत्तर कोरियाकडे विशेष असे सायबर वॉरफेअर गाईडन्स युनिटही आहे, ज्याला 'ब्युरो १२१' म्हटले जाते. ज्यामध्ये सुपरकम्युटर आणि सहा हजार हॅकर्सचा समावेश आहे. यांमधील बरेचसे हॅकर्स बेलारुस, चीन, भारत, मलेशिया आणि रशिया सारख्या देशांमधून काम करतात, अशी माहिती या अहवालात समोर आली आहे.
हेही वाचा : अफगाणिस्तान लष्कराने 32 तालिबानी दहशतवाद्यांना घातले कंठस्नान