ETV Bharat / international

अमेरिकेत 8 लाख 50 हजारहून अधिक लहान मुले कोरोना पॉझिटिव्ह - america latest corona news

गेल्या आठवड्यात 22 ते 29 ऑक्टोबर या कालावधीत एकूण 61 हजार 447 नवीन लहान मुलांना कोरोना संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. हे प्रमाण रोगाचा प्रादुर्भाव सुरू झाला होता, तेव्हापासूनचे सर्वाधिक आहे, असे या संस्थेच्या अहवालात म्हटले आहे.

अमेरिका लहान मुले कोरोना पॉझिटिव्ह न्यूज

author img

By

Published : Nov 5, 2020, 2:19 PM IST

वॉशिंग्टन - अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांमध्ये लहान मुलांची संख्या 8 लाख 50 हजारहून अधिक झाली आहे. अमेरिकन अ‍ॅकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स आणि चिल्ड्रन हॉस्पिटल असोसिएशनच्या नव्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. जगभरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत आढळले आहेत.

वृत्तसंस्था सिन्हुआनुसार, गेल्या आठवड्यात 22 ते 29 ऑक्टोबर या कालावधीत एकूण 61 हजार 447 नवीन लहान मुलांना कोरोना संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. हे प्रमाण रोगाचा प्रादुर्भाव सुरू झाला होता, तेव्हापासूनचे सर्वाधिक आहे, असे या संस्थेच्या अहवालात म्हटले आहे.

हेही वाचा - न्यूयॉर्कमधील विमानतळांवर मास्क न घातल्यास होणार 50 डॉलर्सचा दंड

ऑक्टोबरमध्ये, सुमारे दोन लाख लहान मुलांना कोरोनाचे संक्रमण झाल्याची गंभीर बाब उघडकीस आली.

अहवालात असे म्हटले आहे की, अमेरिकेत आतापर्यंत 8 लाख 53 हजार 635 बालके आढळून आली आहेत आणि संक्रमित झालेल्यांपैकी 11.1 टक्के लहान बाळे आहेत.

जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या म्हणण्यानुसार, बुधवारी पहाटेपर्यंत अमेरिकेत कोरोनाचे एकूण 93 लाख 76 हजार 293 रुग्ण आढळले आहेत. तर, 2 लाख 32 हजार 529 व्यक्तींनी या आजाराने आपले प्राण गमावले आहेत.

हेही वाचा - अमेरिकेत कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची संख्या 1 फेब्रुवारीपर्यंत 4 लाखांवर पोहोचण्याचा अंदाज

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.