सॅन फ्रॅन्सिस्को - यूट्यूबच्या काही एलजीबीटीक्यू यूजर्सनी यूट्यूब आणि त्याची मातृसंस्था 'गुगल'वर खटला दाखल केला आहे. 'घृणा' पसरवणाऱ्या माहितीवरील खराब नियंत्रण आणि एलजीबीटीक्यू क्रिएटर्सच्या व्हिडिओंना होणारा चुकीचा विरोध यासंदर्भात हा खटला आहे.
'सीएनईटी'मध्ये बुधवारी प्रकाशित झालेल्या एका रिपोर्टमध्ये याबाबत माहिती आहे. कॅलिफोर्नियाच्या उत्तरी जिल्ह्यात अमेरिकी जिल्हा न्यायालयात दाखल असलेल्या या खटल्यानुसार, २०१६ पासूनच यूट्यूब आणि गुगल बेकायदेशीर कंन्टेंट बनवणे आणि त्याचे विनिमय तसेच वितरण करण्यात गुंतली आहे. ज्यामुळे, एलजीबीटीक्यू प्लस समुदायाच्या लोकांना आणि समर्थकांना कलंकित करणे, त्यांना प्रतिबंध करणे, त्यांची निंदा करणे आणि त्यांना ब्लॉक करणे हे प्रकार वाढले आहेत.
या रिपोर्टमध्ये असेही लिहिले आहे, की एलजीबीटीक्यू समुदायाच्या लोकांना आर्थिक स्तरावरही भेदभाव सहन करावा लागत आहे. एका यूट्यूबरने याबद्दल व्हिडिओ बनवून त्यात सांगितले, कि यूट्यूब त्यांना जाहिराती विकत घेण्याची परवानगी देत नाही. तसेच त्यांच्या व्हिडिओजचे 'मनीटायझेशन'ही करू देत नाही. या यूट्यूबर्समध्ये ब्रिया काम, आणि क्रिसी चेंबर्सचा समावेश आहे. ज्या ब्रियाअँडक्रिसी नावाचे यूट्यूब चॅनल चालवतात. जे एलजीबीटीक्यू दर्शकांसाठी समर्पित आहे.
ब्रियाअँडक्रिसीच्या क्रिसी चेंबर्सचा असा दावा आहे कि, यूट्यूबने त्यांच्या व्हिडिओंना चुकीच्या पद्धतीने प्रतिबंधित केले. ज्यामुळे त्यांच्या दर्शकांची संख्या कमी झाली आणि परिणामी त्यांना जाहिरातींकडून तेवढे पैसे नाही मिळाले, जेवढे त्यांना अपेक्षित होते.