ETV Bharat / international

US Elections 2020 : 'व्हाईट हाऊस'चा दावेदार कोण?, बायडेन यांची आघाडी, तर ट्रम्प 'बॅकफूट'वर - जो बायडेन

जॉर्जिया, नवाडा, नार्थ कॅरोलिना, आणि पेन्सल्वेनिया राज्यासह इतर काही राज्यात मतमोजणी अद्यापही सुरू आहे. त्यामुळे कोण बाजी मारणार हे चित्र स्पष्ट होत नाही. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी कायदेशीर मार्ग स्वीकारत निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

pic
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Nov 6, 2020, 1:07 AM IST

Updated : Nov 6, 2020, 1:43 AM IST

वॉशिंग्टन डी. सी - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक रंगतदार झाली असून डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी मिशिगन आणि विस्कॉन्सिन राज्यात विजय मिळवला आहे. २०१६ च्या निवडणुकीत ही राज्ये रिपब्लिकन पक्षाच्या ताब्यात होती. या विजयानंतर ट्रम्प पुन्हा निवडून येण्याची शक्यता कमी झाली आहे. जो बायडेन यांना आत्तापर्यंत २६४ मते (इलेक्टोरल) मते मिळाली असून ट्रम्प यांना २१४ मते मिळाली आहेत. विजयसाठी उमेदवाराला २७० मतांची गरज असून बायडेन यांना फक्त ६ मतांची गरज आहे. दरम्यान, ट्रम्प यांनी मतमोजणी थांबविण्याची मागणी केली असून न्यायालयाचे दार ठोठावले आहे.

महत्त्वाच्या राज्यातील स्थिती

  • नवाडा राज्यात काट्याची टक्कर पाहायला मिळत आहे. ट्रम्प आणि बायडेन यांच्यात फक्त १२ हजार मतांचा फरक आहे.
  • जॉर्जिया राज्यात ट्रम्प यांना ४९.५ टक्के मते मिळाली आहेत. तर बायडेन यांना ४९.२ टक्के मते मिळाली आहे. दोन्ही उमेदवारांच्या मतात फक्त ०.३ टक्के मतांचा फरक आहे.
  • अ‌ॅरिझोना राज्यात ट्रम्प आघाडीवर आहेत. मात्र, तेथे बायडेन यांच्या मतांमध्ये वाढ होत असून अंतर कमी होत आहे.

मतमोजणी अद्यापही सुरू

जॉर्जिया, नवाडा, नार्थ कॅरोलिना, आणि पेन्सल्वेनिया राज्यासह इतर काही राज्यात मतमोजणी अद्याप सुरू आहे. त्यामुळे अद्याप कोण पुढे जाईल हे चित्र स्पष्ट होत नाही. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी कायदेशीर मार्ग स्वीकारत निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. मात्र, यामुळे ट्रम्प यांना विजयी होण्यास काही मदत मिळले की नाही, हे स्पष्ट नाही.

व्हाईट हाऊसचा दावेदार कोण?

मतदान झाल्यानंतर मागील २ दिवसांपासून मतमोजणी सुरू आहे. मात्र, कोणत्याही एका उमेदवाराला स्पष्ट बहुमत मिळाले नसून काही राज्यात मतदार कोणाल कौल देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ग्रेट लेक राज्यात बायडेन यांचा विजय झाल्याने त्यांची मते २६४ वर पोहचली असून फक्त एका राज्यातील विजय त्यांना व्हाईट हाऊसची दारे खुली करेल. मतदानाची वेळ संपल्यानंतर मोजणीस आलेली मते ग्राह्य धरू नका, अशी ट्रम्प यांची मागणी आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचे वक्तव्य केले असून 'मोजणी थांबवा' असे ट्विट वारंवार केले आहे.

ट्रम्प यांनी तीन राज्यांमध्ये खटले दाखल केले..

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कॅम्पेनने बुधवारी पेन्सिल्व्हेनिया, मिशिगन आणि जॉर्जिया या तीन राज्यांमध्ये खटले दाखल केले आहेत. डेप्युटी कॅम्पेन मॅनेजर जस्टिन क्लार्क यांनी याबाबत माहिती दिली. यापूर्वी त्यांनी पेन्सिल्व्हेनिया आणि नवाडामधील मतदान मोजणी प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासंबंधीची याचिकाही दाखल केली आहे. तसेच, पेन्सिल्व्हेनियामध्ये मतदानाच्या दिवसानंतर तीन दिवसांपर्यंत आलेले बॅलोट मतमोजणीसाठी ग्राह्य धरण्यात यावे की नाही याबाबत सुरू असलेल्या खटल्यामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्नही ट्रम्प कॅम्पेन करत असल्याचे क्लार्क यांनी सांगितले.

नवाडा ठरणार किंगमेकर..

सध्या डोनाल्ड ट्रम्प पेन्सिल्व्हेनिया, नॉर्थ कॅरोलिना, अलास्का आणि जॉर्जियामध्ये आघाडीवर आहेत. या चारही राज्यांमध्ये जर ट्रम्प यांचा विजय झाला, तर त्यांना एकूण ५४ इलेक्टोरल व्होट्स मिळतील. त्यानंतर त्यांच्या एकूण इलेक्टोरल व्होट्सची संख्या २६८ होणार आहे. दुसरीकडे, बायडेन यांच्याकडे आताच २६४ इलेक्टोरल व्होट्स आहेत. विजयासाठी त्यांना आणखी केवळ सहा इलेक्टोरल व्होट्सची गरज आहे. नेव्हाडामध्ये सहा इलेक्टोरल व्होट्स आहेत, आणि तिथे बायडेन आघाडीवर आहेत. त्यामुळे या निवडणुकीत नवाडा किंगमेकर ठरणार आहे.

Last Updated : Nov 6, 2020, 1:43 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.