वॉशिंग्टन - डेमोक्रेटिक पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार जो बिडेन यांनी विस्कॉन्सिन आणि मिशिगन या स्विंग स्टेट्समध्ये (राजकीयदृष्ट्या दोलायमान स्थितीतील राज्यांमध्ये) अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध मोठी आघाडी मिळविली आहे, असे एका नव्या सर्वेक्षणात समोर आले आहे. 2016 च्या निवडणुकीत ट्रम्प यांनी दोन्ही राज्यांत विजय मिळविला होता. मिशिगनमध्ये, बिडेन यांना 40 टक्क्यांविरोधात 48 टक्के असा 8 गुणांचा लाभ मिळाला.
हेही वाचा - कॅलिफोर्नियाः जंगलांमध्ये 21 ठिकाणी भयंकर आगी; अग्निशमन दलाचे 13,800 कर्मचारी देताहेत झुंज
दरम्यान, रविवारी जाहीर झालेल्या सीबीएस न्यूज-यू-गव्ह ट्रॅकिंग पोलमध्ये असे दिसून आले आहे की, मिशिगन आणि नेवाडा या दोन्ही राज्यांत बिडेन यांच्या तुलनेत ट्रम्प 52 टक्के ते 46 टक्क्यांनी मागे आहेत. तसेच, बिडेन विस्कॉन्सिनच्या रियलक्लियर पॉलीटिक्स सरासरीमध्ये 5.5 गुणांनी आणि त्याच साइटच्या मिशिगनच्या सरासरीच्या 7 गुणांनी आघाडीवर होते.
गेल्या आठवड्यात रॉयटर्स-इप्सॉस पोलने केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, माजी उपराष्ट्रपती सध्या पेन्सिल्व्हानियामध्ये 5 टक्के पॉईंटची आघाडी आणि विस्कॉन्सिनमध्ये 6 टक्के आघाडीवर आहेत. हिल न्यूज वेबसाइटने हे वृत्त दिले आहे. तर, पेन्सिल्व्हानिया आणि विस्कॉन्सिन या दोन राज्यांमध्ये बिडेन यांना 50 टक्के समर्थन होते. तर, याच दोन राज्यांमध्ये ट्रम्प यांना अनुक्रमे 45 टक्के आणि 44 टक्के समर्थन मिळाले होते.
फ्लोरिडा, अॅरिझोना, जॉर्जिया, आयोवा, मेन, मिशिगन, मिनेसोटा, नेवाडा, न्यू हॅम्पशायर, नॉर्थ कॅरोलिना, पेनसिल्वेनिया आणि विस्कॉन्सिन ही स्विंग स्टेट्स आहेत.
हेही वाचा - भारताच्या सीमेवर चीनकडून 60 हजार सैन्य तैनात; अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्याचा दावा