कॅलिफोर्निया - गुगलने 'इन्फोवॉर्स' या अँड्रॉइड ॲपला आपल्या प्ले स्टोअरवरून हटवले आहे. कोरोना विषाणूसंबंधी खोटे दावे आणि त्यावर आधारित माहिती पसरवल्याबद्दल ही कारवाई गुगलकडून करण्यात आली आहे.
इन्फोवॉर्स ही अमेरिकन कट-कारस्थान सिद्धांत (अमेरिकन कॉन्स्पायरसी थिअरी) आणि फेक न्यूज पसरवणारी वेबसाईट आहे.
या ॲपद्वारे एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. रेडिओ होस्ट आणि कट-कारस्थान सिद्धांताचे तज्ज्ञ अलेक्स जोन्स यांनी ही पोस्ट टाकली होती. ही बाब सिद्ध झाल्यानंतर गुगलने ही कारवाई केली.
या वादग्रस्त व्हिडिओमध्ये सोशल डिस्टन्सिंगची गरज, एखाद्या ठिकाणी निवारा घेणे आणि विलगीकरण करण्यासाठीचे उपाय याविषयी खोटी माहिती दिली होती. तसेच, यांच्यामुळे कोरोना विषाणूचा प्रसार कसा मंदावता येतो, यासंबंधी चुकीचे दावे केले होते. हा व्हिडिओ काढून टाकण्यापूर्वी तब्बल एक लाख जणांनी तो डाऊनलोड केल्याचे या अहवालात म्हटले आहे.
या घडीला चुकीची माहिती प्ले स्टोअरवरून जाऊ न देणे ही आमच्या टीमची सगळ्यात मोठी प्राधान्यता असल्याचे गुगलच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे.
न्यूयॉर्कचे ॲटर्नी जनरल यांनी जोन्स यांना कोरोना विषाणूसंसर्गावर उपचार करण्यासाठी इन्फोवॉर्सवरून मार्केटिंग केलेल्या उत्पादनांची विक्री न करण्याचे आदेश दिले आहेत. अलेक्स जोन्स यांनी आत्ताच्या भयंकर परिस्थितीत पसरवलेली चुकीची माहिती अत्यंत धोकादायक आहे. यामुळे लोकांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण होऊ शकतो, असे जेम्स यांनी पुढे म्हटले आहे.
अॅपलने यापूर्वीच सप्टेंबर 2018 मध्ये त्यांच्या प्ले स्टोअरवरून हे ॲप कायमस्वरूपी हटवले होते. तसेच, जोन्स आणि इन्फोवॉर्स या दोघांनाही ट्विटरवरून देखील यापूर्वीच हटवण्यात आले आहे.