हैदराबाद - जगभरामध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा आकडा वाढतच चालला असून गेल्या 24 तासांत जागतिक स्तरावर तब्बल 1 लाख 94 हजार 957 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 9 हजार 288 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिका, भारत आणि ब्राझिलमध्ये सर्वांत जास्त कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.
जगातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या सुमारे पावणेतीन कोटींपर्यंत पोहोचली आहे. जगभरात 2 कोटी 74 लाख 85 हजार 488 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. आत्तापर्यंत कोरोनामुळे संपूर्ण जगात 8 लाख 96 हजार 842 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच, 1 कोटी 95 लाख 73 हजार 99 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. अमेरिकेत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
अमेरिकेत आतापर्यंत 64 लाख 80 हजार रुग्णांची नोंद झाली. तर भारत सध्या दुसऱ्या स्थांनावर असून गेल्या 24 तासांमध्ये देशात तब्बल 75 हजार 809 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 42 लाख 80 हजार 697 झाली आहे. तर तिसऱ्या स्थानावर ब्राझील असून तिथे 41 लाख 47 हजार रुग्ण आढळले आहेत.
जगभरात ३० हजारांहून अधिक कोरोना बळींची नोंद झालेल्य देशांमध्ये मेक्सिको, ब्रिटन, इटली आणि फ्रान्सचाही समावेश होतो.