बीजिंग - उत्तर चीनच्या शांक्सी प्रांतात गेल्या आठवड्यात कोळशाची खाणीत पाणी भरले होते. यामुळे 5 खाण कामगारांचा मृत्यू झाला. पाणी ओसरल्यानंतर या कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली.
हेही वाचा - वर्षाअखेर उपलब्ध होणार बायोएनटेक आणि फायझर कंपनीची कोरोना लस
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री 11.57 वाजता अडकलेल्या पाच मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. तेव्हा येथील बचावकार्य संपले. जिओझोऊ शहरातील माहुआ वेन्गुआयुआन कोळसा खाण कंपनी लिमिटेड या खाणीचे संचालन करीत आहे.
वृत्तसंस्था सिन्हुआच्या वृत्तानुसार 11 नोव्हेंबरला जेव्हा हा अपघात झाला, तेव्हा तेथे एकूण 91 खाण कामगार कार्यरत होते.
हेही वाचा - ...म्हणून बराक ओबामा यांच्या मनात भारताविषयी विशेष स्थान