ख्रिस्टचर्च - न्यूझीलंडमधील ख्रिस्टचर्चमध्ये गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराचे अकाउंट फेसबुकने काढून टाकले आहे. या हल्लेखोराने दोन मशिदीवरील हल्ल्याच्या घटनेचे लाईव्ह स्ट्रीमिंग केले होते.
पोलिसांनी व्हिडिओ काढून टाकण्याची फेसबुकला सूचना केली होती. त्यानंतर तो व्हिडिओ फेसबुक व इन्स्टाग्रामवरून काढून टाकण्यात आला आहे. आम्ही त्या हल्ल्याचे समर्थन अथवा पाठिंबा देणाऱ्या पोस्टही काढत असल्याचे मिया गॅरलीक (फेसबुक न्यूझीलंड कार्यालय) यांनी म्हटले आहे. आम्ही सातत्याने न्यूझीलंड पोलिसांबरोबर काम करत आहोत. त्यांना तपासात मदत करत असल्याचे फेसबुकने म्हटले आहे. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी ४ जणांना अटक केली आहे. यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. हल्लेखोरांनी अल नूर आणि लिनवूड येथील मशिदीत गोळीबार केला होता.