वॉशिंग्टन - रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर आक्रमण करण्याचा निर्णय घेतला आहे, असा विश्वास अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ( US President Joe Biden on Ukraine-Russia ) शुक्रवारी व्यक्त केला. रशिया-युक्रेन संकटावर व्हाईट हाऊसमध्ये ते बोलत होते. रशियन सैन्याचा आगामी काळात युक्रेनवर हल्ला करण्याचा विचार आहे. आमचा विश्वास आहे की ते युक्रेनची राजधानी कीवला लक्ष्य करतील, असे बायडेन यांनी म्हटलं.
-
We have reason to believe that Russian forces intends to attack Ukraine in the coming days. We believe that they will target Ukraine’s capital Kyiv: US President Joe Biden pic.twitter.com/3vim7FSEni
— ANI (@ANI) February 18, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">We have reason to believe that Russian forces intends to attack Ukraine in the coming days. We believe that they will target Ukraine’s capital Kyiv: US President Joe Biden pic.twitter.com/3vim7FSEni
— ANI (@ANI) February 18, 2022We have reason to believe that Russian forces intends to attack Ukraine in the coming days. We believe that they will target Ukraine’s capital Kyiv: US President Joe Biden pic.twitter.com/3vim7FSEni
— ANI (@ANI) February 18, 2022
रशियाने युक्रेनवर आणखी आक्रमण केल्यास त्यावर कठोर निर्बंध लादण्यास तयार आहोत. रशिया अजूनही मुत्सद्देगिरी निवडू शकतो. वाटाघाटीच्या टेबलावर परत येण्यास उशीर झालेला नाही, असेही अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन म्हणाले.
रशियाने आपल्या योजनांचा पाठपुरावा केला तर, ते विनाशकारी आणि अनावश्यक युद्धासाठी जबाबदार असतील. अमेरिका युक्रेनमध्ये लढण्यासाठी सैन्य पाठवणार नाही. परंतु, आम्ही युक्रेनच्या जनतेला पाठिंबा देत राहू, असे बायडेन म्हणाले.
आम्ही रशियाच्या योजना वारंवार उल्लेख करत आहोत. कारण, आम्हाला संघर्ष हवा आहे म्हणून नाही तर युक्रेनवर आक्रमण करण्यापासून रशियाला रोखण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असेही ते म्हणाले. तसेच रशियाने जर युद्ध निवडले असेल आणि तसे करण्यासाठी त्यांना मोठी किंमत मोजावी लागेल, असे त्यांनी म्हटलं.
रशिया-युक्रेन वाद -
सोव्हिएत युनियनमधून वेगळा झाल्यापासून रशिया आणि युक्रेन यांच्यात अंतर्गत संघर्ष पाहायला मिळत आहे. युक्रेन हा रशियाचाच भाग असून त्याचं स्वतंत्र अस्तित्व आहे. मात्र, अनेक रशियन हे स्वतंत्र अस्तित्व मान्य करत नाहीत. अशात युक्रेन आणि नाटो देशांची जवळीक हा रशियासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. युक्रेन आणि रशियामधील संघर्षाने आंतरराष्ट्रीय राजकरणात वादंग पाहायला मिळत आहे.
हेही वाचा - Russia-Ukrain Issue : रशिया युक्रेनवर हल्ला करण्याच्या तयारीत - अमेरिका