ETV Bharat / international

टान्झानिया देशात पुरामुळे २१ जणांचा मृत्यू - लिंडी प्रांत पूर

टान्झानियात पुरामुळे १५ हजार नागरिक बेघर झाले आहेत. किलवा, किशीवाणी काऊंटी भागामध्ये आलेल्या पुरात ५०० नागरिक अडकले आहेत.

flood in tanzania
टान्झानिया देशात पूर
author img

By

Published : Feb 2, 2020, 1:43 PM IST

दोडोमा - दक्षिण आफ्रिका खंडातील टान्झानिया देशाला पुराचा फटका बसला आहे. देशाच्या दक्षिण-पूर्वेकडील लिंडी प्रांतात २१ जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे.

मागील आठवड्यात लिंडी प्रांतात जोरदार पाऊस झाल्याने लहान मोठ्या नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे परिसरात पाणी साठले आहे. लिंडी प्रदेशातील किलवा, किशीवाणी काऊंटी भागामध्ये आलेल्या पुरात ५०० नागरिक अडकले आहेत. टान्झानिया लष्कराने बचाव आणि मदतकार्य सुरू केले आहे. अडकलेल्या नागरिकांनी हेलिकॉप्टरद्वारे बाहेर काढण्यात येत आहे.

पुरामुळे १५ हजार नागरिक बेघर झाले आहेत. आधी १३ नागरिकांचा मृत्यू झाला होता. मात्र, या आठवड्यात मृतांचा आकडा वाढून २१ झाला आहे. टान्झानियामध्ये 'ग्रेट आफ्रिकन लेकस्' असून या भागात जगातील तिसरे मोठे 'लेक व्हिक्टोरिया' हे फ्रेश वॉटर लेक आहे. तसेच हा भाग दऱ्या-खोऱ्यांनी बनलेला आहे.

Intro:Body:

टान्झानिया देशात पुरामुळे २१ जणांचा मृत्यू

दोडोमा दक्षिण आफ्रिका खंडातील टांन्झानिया देशाला पुराचा जोरदार फटका बसला आहे. देशाच्या दक्षिण पूर्वेकडील लिंडी प्रांतात २१ जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे.

मागील आठवड्य़ात लिंडी प्रांतात जोरदार पाऊस झाल्याने लहान मोठ्या नद्यांना पुर आला आहे. किलवा, किशीवाणी काऊंन्टी भागामध्ये आलेल्या पुरात ५०० नागरिक अ़डकले आहेत. टान्झानिया लष्कराने बचाव आणि मदतकार्य सुरू केले आहे. अडकलेल्या नागरिकांनी हेलिकॉप्टरद्वारे बाहेक काढण्यात येत आहे.

पुरामुळे १५ हजार नागरिक बेघर झाले आहेत. आधी १३ नागरिकांचा मृत्यू झाला होता. मात्र, या आठवड्यात मृतांचा आकडा वाढून २१ झाला आहे.

टान्झानियामध्ये 'ग्रेट आफ्रिकन लेकस्' असून या भागात जगातील तिसरे मोठे 'फ्रेश वॉटर लेक' लेक व्हिक्टोरिया आहे. तसेच हा भाग दऱ्या खोऱ्यांनी बनलेला आहे.     

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.