ETV Bharat / headlines

Sakal Maratha Samaj : नवीन कर्ज उपलब्ध होईना.. मराठा समाज मुंबईत अण्णासाहेब पाटील महामंडळावर धडकणार - सकल मराठा समाज मुंबई धडक

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी व वाढती बेरोजगारी लक्षात घेऊन आर्थिक उन्नती मिळावी, मराठा समाजातील लोकांना ( Sakal Maratha Samaj ) अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत व्यवसायाकरिता कर्ज दिले जाते. त्यामधून लोकांना रोजगार मिळावा, हा उद्देशही असतो. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून सरकारकडून व्याज परतावा मिळत नसल्याने बँका नवीन कर्ज प्रकरणे ( Loan issues of Annasaheb Patil Mahamandal ) उपलब्ध करून देत नाहीत.

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील

author img

By

Published : Dec 7, 2021, 7:44 PM IST

Updated : Dec 8, 2021, 12:57 AM IST

कोल्हापूर - सकल मराठा समाज ( Sakal Maratha Samaj ) बुधवारी मुंबईत अण्णासाहेब पाटील महामंडळावर धडक देणार आहे. मराठा समाजासाठी उपयुक्त ठरलेल्या या महामंडळाकडून व्याज परतावे आणि नवीन कर्ज प्रकरणे मंजूर केली जात नसल्याचा ( Loan issues of Annasaheb Patil Mahamandal )आरोप मराठा समाजाचा आहे.

बोलताना दिलीप पाटील

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी व वाढती बेरोजगारी लक्षात घेऊन आर्थिक उन्नती मिळावी, मराठा समाजातील लोकांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत व्यवसायाकरिता कर्ज दिले जाते. त्यामधून लोकांना रोजगार मिळावा, हा उद्देशही असतो. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून सरकारकडून व्याज परतावा मिळत नसल्याने बँका नवीन कर्ज प्रकरणे उपलब्ध करून देत नाहीत. याचाच जाब विचारण्यासाठी सकल मराठा समाज ८ डिसेंबर रोजी मुंबईतील अण्णासाहेब पाटील महामंडळावर धडक देणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील ( Maratha Kranti Morcha coordinator Dilip Patil ) यांनी सांगितले आहे. जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही असा इशाराही देण्यात आला आहे.

हेही वाचा-संजय राऊत, राहुल गांधी यांची बैठक संपली; काँग्रेसशिवाय युतीबाबत राऊत म्हणाले...

आर्थिक दुर्बल घटकांसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ

राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांची संख्या लक्षात घेऊन मराठा समाजातील सुशिक्षित बेरोजगारांच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग खुला करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली होती. या माध्यमातून समाजातील नागरिकांना व्यवसायाकरिता ( Schemes of Annasaheb Patil Mahamandal ) अर्थसहाय्य दिले जाते. महामंडळ कंपनी कायदा 1956 अंतर्गत नोंदणीकृत आहे. महामंडळात बीज भांडवल कर्ज योजनेंतर्गत अर्जदारास 5 लाखापर्यंत गुंतवणुकीची प्रकल्प मर्यादा आहे. त्यामधून व्यवसायाकरिता अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येते. त्यामुळे या महामंडळाला जाब विचारण्यासाठी राज्यभरातील सकल मराठा समाज मुंबईत धडक देणार आहे.

हेही वाचा-Padma Shri Nanda Sir Passes Away : 104 वर्षीय पद्मश्री नंदा सरांचे निधन

Last Updated : Dec 8, 2021, 12:57 AM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.