ETV Bharat / headlines

भारत आधुनिक पायाभूत सुविधांमध्ये १.३ ट्रिलियन डॉलर्सची करणार गुंतवणूक - पंतप्रधान मोदी - पंतप्रधान नरेंद्र मोदी

न्यूयॉर्क येथे सुरू असलेल्या ब्लूमबर्ग ग्लोबल बिझनेस फोरममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. यावेळी त्यांनी भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर्स करण्याचे लक्ष्य असल्याचा पुनरुच्चार करत परदेशी गुंतवणूकदारांना भारतामध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन केले.

ब्लूमबर्ग ग्लोबल बिझनेस फोरम
author img

By

Published : Sep 25, 2019, 7:33 PM IST

Updated : Sep 25, 2019, 7:42 PM IST

न्यूयॉर्क - येत्या काही वर्षांत भारत आधुनिक पायाभूत सुविधांमध्ये १.३ ट्रिलियन डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. तसेच देशाच्या सामाजिक पायाभूत सुविधांवर लाखो कोटी रुपये खर्च केले जात आहेत, असे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ब्लूमबर्ग ग्लोबल बिझनेस फोरममध्ये आपल्या मुख्य भाषणात त्यांनी हे सांगितले.

  • PM Modi at Bloomberg Global Business Forum in New York: Now in the coming years, India is going to invest 1.3 trillion dollars in modern infrastructure. Also, lakhs of crores of rupees are being spent on social infrastructure of the country. pic.twitter.com/EXl6J4Gal3

    — ANI (@ANI) September 25, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर्स करण्याचे लक्ष्य सध्या भारतासमोर आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी भारताकडे पुरेसे धाडस, क्षमता आणि परिस्थितीदेखील आहे. लोकशाही, लोकसंख्याशास्त्र, मागणी आणि निर्णायकपणा हे चार घटक आहेत, जे भारताला अद्वितीय आणि गुंतवणूकदारांसाठी विश्वासार्ह बनवतात. तुम्हाला जर जगातील सर्वात मोठ्या शहरीकरणात आणि सर्वात जास्त पायाभूत सुविधा असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करायची असेल, तर तुम्ही नक्कीच भारतात या.

  • #WATCH PM at Global Business Forum in #NewYork: If you want to invest in a market where there is scale, come to India....If you want to invest in one of the largest infrastructure ecosystems and urbanisation, then come to India pic.twitter.com/Hgw7C44g7H

तुमच्या इच्छा आणि आमची स्वप्ने उत्तम प्रकारे जुळतात. तुमचे तंत्रज्ञान आणि आमचे कौशल्य जग बदलू शकते. तुमचे स्केल आणि आमची कौशल्ये ही जागतिक अर्थव्यवस्थेला चालना देऊ शकतात. तुमची विवेकपूर्ण पद्धत आणि आमचे व्यावहारिक विचार मिळून व्यवस्थापनात नवे आयाम उघडू शकतात. तुमचे तर्कशुद्ध मार्ग आणि आमची मानवी मूल्ये जगाचा मार्ग शोधू शकतात आणि हे सर्व होत असताना कोठेही कसलाही दुरावा निर्माण झाला, तर मी नक्कीच वैयक्तीकरित्या दोन्हीमधला दुवा म्हणून काम करेल, असे म्हणत मोदी यांनी आपल्या भाषणातून परदेशी गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले.

  • #WATCH PM at Global Business Forum in #NewYork: Friends, your desires&our dreams match perfectly. Your technology and our talent can change the world; Your scale&our skills can speed up global economic growth....And if there is any gap anywhere;I will personally act as a bridge. pic.twitter.com/T0TbGhP5mu

भारताने सध्या एकदाच वापरता येणाऱ्या प्लास्टिकवर बंदी आणली आहे. यावर्षी २ ऑक्टोबर म्हणजेच गांधी जयंतीला संपूर्ण देशामध्ये 'सिंगल यूज प्लास्टिक' विरोधात मोहीम राबवली जाणार आहे, असेही मोदी यांनी स्पष्ट केले.

  • PM Modi at Bloomberg Global Business Forum in New York: India has banned single-use plastic in the country. A big movement has been started to discourage its usage. A nationwide campaign against single-use plastic will be held on Mahatma Gandhi's birth anniversary on 2 October. pic.twitter.com/MerllvaQyL

हेही वाचा : स्वच्छ भारत अभियानासाठी पंतप्रधान मोदी 'ग्लोबल गोलकिपर' पुरस्काराने सन्मानित

Intro:Body:

India is going to invest 1.3 trillion dollars in modern infrastructure says Modi at Bloomberg Global Business Forum

Bloomberg Global Business Forum, Modi at Bloomberg Global Business Forum, Modi in New York, #ModiInNewYork, भारत करणार १.३ ट्रिलियन डॉलर्सची गुंतवणूक, ब्लूमबर्ग ग्लोबल बिझनेस फोरम, पंतप्रधान नरेंद्र मोदी, ५ ट्रिलियन डॉलर्स 

आधुनिक पायाभूत सुविधांमध्ये भारत करणार १.३ ट्रिलियन डॉलर्सची गुंतवणूक : मोदी

न्यूयॉर्क - येत्या काही वर्षांत भारत आधुनिक पायाभूत सुविधांमध्ये १.3 ट्रिलियन डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. तसेच, देशाच्या सामाजिक पायाभूत सुविधांवर लाखो कोटी रुपये खर्च केले जात आहेत. असे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ब्लूमबर्ग ग्लोबल बिझनेस फोरममध्ये आपल्या मुख्य भाषणात त्यांनी हे सांगितले.

भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर्स करण्याचे लक्ष्य सध्या भारतासमोर आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी भारताकडे पुरेसे धाडस, क्षमता आणि परिस्थितीदेखील आहे. लोकशाही, लोकसंख्याशास्त्र, मागणी आणि निर्णायकपणा हे चार घटक आहेत, जे भारताला अद्वितीय आणि गुंतवणूकदारांसाठी विश्वासार्ह बनवतात.

मित्रांनो, तुम्हाला जर जगातील सर्वात मोठ्या शहरीकरणात आणि सर्वात जास्त पायाभूत सुविधा असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करायची असेल, तर तुम्ही नक्कीच भारतात या.

तुमच्या इच्छा आणि आमची स्वप्ने उत्तम प्रकारे जुळतात. तुमचे तंत्रज्ञान आणि आमचे कौशल्य जग बदलू शकते; तुमचे स्केल आणि आमची कौशल्ये ही जागतिक अर्थव्यवस्थेला चालना देऊ शकतात. तुमची विवेकपूर्ण पद्धत आणि आमचे व्यावहारिक विचार मिळून व्यवस्थापनात नवे आयाम उघडू शकतात; तुमचे तर्कशुद्ध मार्ग आणि आमची मानवी मूल्ये जगाचा मार्ग शोधू शकतात; आणि हे सर्व होत असताना कोठेही कसलाही दुरावा निर्माण झाला, तर मी नक्कीच वैयक्तीकरित्या दोन्हीमधला दुवा म्हणून काम करेल. असे म्हणत, मोदी यांनी आपल्या भाषणातून परदेशी गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले.

भारताने सध्या एकदाच वापरता येणाऱया प्लास्टिकवर बंदी आणली आहे. यावर्षी २ ऑक्टोबर म्हणजेच गांधी जयंतीला संपूर्ण देशामध्ये 'सिंगल यूज प्लास्टिक' विरोधात मोहीम राबवली जाणार आहे. असेही मोदी यांनी स्पष्ट केले.

Conclusion:
Last Updated : Sep 25, 2019, 7:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.