हाँगकाँग - हाँगकाँगचे प्रमुख नेते कॅरी लॅम यांनी 6 सप्टेंबरला होणारे मतदान एका वर्षासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय शुक्रवारी जाहीर केला. हा मागील सात वर्षांतील सर्वांत कठीण निर्णय असून कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे तो आपल्याला घ्यावा लागला आहे, असे लॅम यांनी सांगितले. मात्र, विरोधकांनी आपल्याला विधानसभेत बहुमत मिळू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप केला आहे.
चीनमधील हाँगकाँग सिटी अर्ध-स्वायत्त असून येथे विधानसभेच्या निवडणुका एका वर्षासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सध्या चीनमध्ये कोरोना विषाणूचा पुन्हा उद्रेक झाला आहे. निवडणुका लांबणीवर टाकण्यासाठी हेच कारण असल्याचे येथील सरकारचे म्हणणे आहे. हाँगकाँग सरकार सध्या आणीबाणीच्या अध्यादेशाची मागणी करीत आहे. तसेच, असा निर्णय घेण्यास चीन सरकारचे पाठबळ असल्याचे लॅम म्हणाले.
दरम्यान येथील 22 विधानसभा सदस्यांच्या गटाने या घोषणेपूर्वीच सरकार कोरोनाच्या उद्रेकाचा येथील निवडणुका आणि आपली हार टाळण्यासाठी वापर करत असल्याचे निवेदन जारी केले. तसेच, हा लोकशाही समर्थकांसाठी मोठा हादरा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हाँगकाँग सिटीमध्ये जुलैच्या सुरुवातीपासून 7.5 दशलक्ष लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. येथे शुक्रवारी 3 हजार 273 नवे बाधित रुग्ण आढळून आले. एक जुलैच्या तुलनेत हा आकडा दुपटीहून अधिक आहे. यामुळे सरकारने सोशल डिस्टन्सिंगचे नियम कडक केले आहेत.