ETV Bharat / headlines

मुंबईला पावसाने झोडपले, सखल भागात पाणी साचल्याने रस्ते वाहतूक वळवली - mumbai waterlogging due to heavy rain

सोमवारी रात्री 8 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत शहर विभागात 84.25, पूर्व उपनगरात 44.39, पश्चिम उनगरात 36.14 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर मध्यरात्री 1 वाजेपर्यंत शहर विभागात 116.6, पूर्व उपनगरात 50.95, पश्चिम उनगरात 51.99 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

traffic turn due to continuous rain in mumbai

author img

By

Published : Aug 4, 2020, 8:38 AM IST

Updated : Aug 4, 2020, 12:41 PM IST

मुंबई - हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार सोमवारी सायंकाळपासून पावसाने मुंबईत हजेरी लावली आहे. रात्री 8 च्या दरम्यान पावसाने जोर धरला होता. मध्यरात्रीपर्यंत जोरदार पाऊस पडल्याने मुंबईत अनेक सखल भागात पाणी साचले आहे. पाणी साचल्याने रस्ते आणि बेस्टच्या बसचे मार्ग वळवण्यात आले असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.

सोमवारी रात्री 8 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत शहर विभागात 84.25, पूर्व उपनगरात 44.39, पश्चिम उनगरात 36.14 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर मध्यरात्री 1 वाजेपर्यंत शहर विभागात 116.6, पूर्व उपनगरात 50.95, पश्चिम उनगरात 51.99 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मुंबईत जोरदार पाऊस पडल्याने हिंदमाता, दादर टीटी, शक्कर पंचायत, एसआयईएस महाविद्यालय, भेंडी बाजार जंक्शन, षण्मुखानंद हॉल, गोयल देऊळ, शेख मिस्त्री दरगाह मार्ग येथे पाणी साचले आहे. पाणी साचल्याने या विभागातील रस्ते वाहतुकीवर परिणाम झालेला आहे. सायन रोड नंबर 24, किंग सर्कल आणि भाऊ दाजी रोड येथील वाहतूक वळवण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.

Last Updated : Aug 4, 2020, 12:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.