मुंबई - छोटा पडदा आणि मोठा पडदा यांचा सर्वसाधारणपणे एकत्रित संबंध येत नाही. परंतु छोट्या पडद्यावरील 'नवा गडी नवं राज्य' या नव्या मालिकेचा मोठ्या पडद्यावर प्रीमियर झाला. झी मराठीवर 'नवा गडी नवं राज्य' ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला ८ ऑगस्ट पासून येणार आहे.
रमा आणि आनंदीच्या संसाराची गोड गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेत प्रमुख भूमिकेत अनिता दाते , पल्लवी पाटील आणि कश्यप परुळेकर सोबतच साईशा भोईर असणार आहेत. टेलिव्हिजनच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदांच मालिकेच्या निमित्ताने दिव्य प्रीमियर सोहळा मुंबईमध्ये आयोजित केला होता. यावेळी मालिकेचे सर्व कलाकार, तंत्रज्ञ सोबतच मनोरंजन क्षेत्रातील पत्रकार मंडळी देखील प्रीमियरला उपस्थित होती.
यावेळी अनिता दाते, पल्लवी पाटील आणि कश्यप परुळेकर यांनी आनंद व्यक्त करून आपल्या भावना व्यक्त केल्या, "आम्ही या प्रीमियरसाठी खूप उत्सुक होतो कारण मराठी मालिकेचा असा भव्य प्रीमियर होणं हे कदाचित पहिल्यांदाच होत असेल. यासाठी आम्ही व आमच्या सर्व टीमने खूप मेहेनत घेतली. प्रीमियर बघून आम्ही खूप खुश झालो आहोत. आम्हाला पूर्ण खात्री आहे की आमची ही आगळीवेगळी मालिका प्रेक्षकांच्या मनात नक्कीच स्थान मिळवेल."
'नवा गडी नवं राज्य' ८ ऑगस्टपासून रात्री ९ वा. झी मराठी वर प्रसारित होणार आहे.
हेही वाचा - Urfi Javed: उर्फी जावेद कोकिलाबेन रुग्णालयात दाखल; जेवणही तिला आवडेना