मुंबई - अभिनेता रितेश देशमुखची पत्नी आणि जेनेलिया देशमुख ३० डिसेंबर २०२२ रोजी प्रदर्शित झालेल्या 'वेड' या मराठी चित्रपटातून झळकली होती. या चित्रपटाला मराठी प्रेक्षकांनी भरपूर उचलून धरले. बॉक्स ऑफिसवरही तडाखेबंद कामगिरी केल्यानंतर जेनेलिया देशमुख ही 'ट्रायल पीरियड' या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. अलिकडेच रिलीज झालेल्या या ट्रेलरला प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद दिला होता. ही मालिका जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणार आहे.
'ट्रायल पीरियड' मालिकेच्या ट्रेलरला खूप सकारात्मक प्रतिसाद प्रेक्षकांनी दिला. या ट्रेलरमधील रंजक आशयाने प्रेक्षकांची मने वेधली. यात जेनिलिया जदेशमुख, मानव कौल आणि गजराज राव यासारख्या प्रतिभावान कलाकरांनी कामे केले आहे. 'ट्रायल पीरियड ही वेब सिरीज २१ जुलै पासून जिओ सिनेमावर प्रसारित होण्यास सुरुवात होईल.
'ट्रायल पीरियड' ही वेब सीरिज जिओ स्टुडिओ सादर करत आहे. या मालिकेची निर्मिती क्रोम पिक्चर्स प्रोडक्शन बॅनरखाली करण्यात आली आहे. या मालिकेच्या लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी आलिया सेनने घेतली आहे. जिओ सिनेमा हा ओटीटी विनामुल्य असल्याने प्रेक्षकांना ही मालिका पाहणे सहज शक्य होणार आहे.
काय आहे 'ट्रायल परिरीयड'ची कथा? - आजकाल लोक कुठलीही वस्तु ऑन लाईन शॉपिंगच्या माध्यमातून मागवत असताना त्यासोबत ट्रायल पिरीयडचीही ऑफर असते. म्हणजे ती वस्तु तुम्हाला योग्य वाटली नाही, तर तुम्ही ती परत बदलू शकता. जनेलियाच्या मुलाला ही बातमी शक्ती कपूर आजोबांकडून कळते आणि तो आईकडे एक वडील मागवण्याची विनंती करतो. मग जेनेलिया मुलाची मागणी पूर्ण करण्यासाठी परिवर्तन प्लेसमेंट एजन्सी असलेल्या गजराज रावकडे येते आणि मुलासाठी एक वैतागवाना वडील पाहिजे असल्याचे सांगते. मानव कौल हा बेरोजगार त्यांच्या संपर्कात असतो आणि त्याला राहण्यासाठी घर नसते. मग काय झाला ना जुगाड, तर अशा प्रकारे मुलाचा पापा बनलेला मानव कौल घरी पोहोचतो आणि सुरू होते ही 'ट्रायल परिरीयड'ची धमाल कहानी. यात तो त्या मुलाला कसे सांभाळतो आणि जेनेलियासोबत त्याचे पुढे कसे संबंध राहतात हे या वेब सिरीजमधून पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा -
२. Rashmika Mandanna : रश्मिका मंदान्नाचा कॅज्युएल अवतार, विमानतळावर झाली क्लिक
३. Sonu Sood : सोनू सूदचा 'संकल्प', देणार मोफत कायदा प्रशिक्षण!