ETV Bharat / entertainment

Dev Anand 100th birth anniversary : देव आनंद यांच्या जयंती निमित्य फोटो झीनत अमान यांनी दिला आठवणींना उजाळा

Dev Anand 100th birth anniversary : आयकॉनिक अभिनेता देव आनंद यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त अनेक सेलेब्रिटींनी त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजळा दिला आहे. झीनत अमान यांनी इन्स्टाग्रामवर त्यांच्यासाठी एक ह्रदयस्पर्शी चिठ्ठीही लिहिली आहे.

Dev Anand 100th birth anniversary
झीनत अमान यांनी दिला आठवणींना उजाळा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 26, 2023, 3:51 PM IST

मुंबई - Dev Anand 100th birth anniversary : ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान यांनी दिग्गज दिवंगत अभिनेता देव आनंद यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण केले. झीनत यांनी त्यांच्या सोशल मीडियावर देव आनंदसोबत त्यांच्या सुरुवातीच्या चित्रपटांमधील दोन थ्रोबॅक फोटो शेअर केले आहेत. या खास दिवशी त्यांनी देवसाहेबांसाठी एक ह्रदयस्पर्शी चिठ्ठी लिहिली आहे.

इंस्टाग्रामवर थ्रोबॅक फोटो शेअर करताना, झीनत अमान यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, 'देव साहब 100 वर्षे साजरे करत आहेत. स्टायलिश, विनम्र आणि विपुल असे देव साहेब हे तुलनेच्या ललिकडचे डायनामो होते. त्यांच्याकडे कितीतरी औदार्य आणि प्रतिभा होती. मी त्यांच्यासोबत करिअरला सुरुवात केली, त्यांनी सर्जनशील डोकी एकत्र आणली आणि पिढ्या पिढ्यांमध्ये गुंजणारे चित्रपट बनवले. त्यांच्या जन्मापासून संपूर्ण शतकभर त्यांचा वारसा सन्मानित होताना पाहून माझे मन आनंदित झाले. अलीकडच्या काही दिवसांत, त्यांच्याबद्दलच्या कमेंट्ससाठी विनंत्या आल्याने मी भारावून गेले आहे, पण त्यात भर घालण्यासारखे थोडेच आहे. मी या आधीच सर्व सांगितले आहे.'

झीनत अमान यांनी पुढे लिहिले, 'मी काही आठवड्यांपूर्वीच त्यांच्याबद्दल तीन भागांची मालिका पोस्ट केली असली तरी, मी आमच्या सुरुवातीच्या चित्रपटांमधील या दोन फ्रेम्सच्या नॉस्टॅल्जियाला रोखू शकत नाही. माझ्या जुन्या फॉलोअर्सना ते लगेच ओळखता येतील, पण मला तुम्हा नव्या फॉलोअर्सबद्दल फारशी खात्री नाही.'

26 सप्टेंबर 1923 रोजी पंजाबमध्ये जन्मलेले देव आनंद हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखले जातात. गेल्या सहा वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी गाईड, टॅक्सी ड्रायव्हर, ज्वेल थीफ आणि सीआयडीसारख्या चित्रपटांमध्ये आपल्या भूमिकांनी एक ठसा उमटवला. अभिनेता असण्यासोबतच ते एक लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता देखील होते. हिंदी चित्रपटसृष्टीला लोकप्रिय बनवण्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. गाईड या गाजलेल्या लोकप्रिय चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली होती आणि यामध्ये वहिदा रहमानसोबत अप्रतिम भूमिकाही साकारली होती. हा त्यांच्या सर्जनशीलतेचा उत्तम पुरावा आहे आणि तो कायमस्वरुपी क्लासिक म्हणूनच ओळखला जाईल.

हेही वाचा -

१. Movie Teen Adakun Sitaram : आलोक राजवाडेचा लंडनमध्ये झाला होता 'तीन अडकून सीताराम'

२. Dadasaheb Phalke Award 2023 : वहिदा रहमान यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार

३. film Shivarayancha Chhawa : दिग्पाल लांजेकरांच्या आगामी 'शिवरायांचा छावा' चित्रपटाची घोषणा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.