मुंबई: विक्की कौशल आणि सारा अली खानचा 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी किती कमाई केली याचा रिपोर्ट कार्ड बाहेर आले आहे. या चित्रपटाने सुरुवातच फार धमाकेदार केली आहे. व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांच्या मते, चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी 5.49 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
ऑफिस कलेक्शन : बाय-1-गेट-1 फ्रि या ऑफरमुळे तसेच तिकीटांच्या कमी किंमतीमुळे या चित्रपटाला फार फायदा झाला आहे, असं म्हटलं जात आहे. आता हा चित्रपट दुसऱ्या दिवशी किती कमाई करतो? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. तरण आदर्श यांच्या ट्विटनुसार पीवीआर 1.54 कोटी, आयनोक्स 1.11 कोटी तर सिनेपोल्स 70 लाख इतक्या रुपयांची कमाई करून दिली आहे. 'जरा हटके जरा बचके' हा चित्रपट शनि-रविवारी किती कमाई करणार यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. आज बाय-1-गेट-1 मोफत तिकीट ऑफर रविवार रात्रीपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे सुरुवातीच्या वीकेंडमध्ये हा चित्रपट जास्त कमाई करेल असे दिसत आहे.
जरा हटके जरा बचके : लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित, 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटाची शूटिंग ही इंदूरमध्ये झाला आहे. तसेच या चित्रपटाची कहाणी एका मध्यमवर्गीय जोडप्याभोवती फिरणारी आहे. तत्पूर्वी, विक्कीने या चित्रपटाबद्दलच्या बोलताना सांगितले की, 'लक्ष्मण सर आणि मॅडॉक यांच्यासोबत काम करणे हा एक आनंददायी अनुभव होता. मला चित्रपटाच्या शूटिंगसाठी, विशेषत: सारासोबत खूप छान वेळ मिळाला. या चित्रपटामधून प्रेक्षकांनाही आमच्याप्रमाणेच आनंद मिळेल'. चित्रपटबद्दल बोलतांना साराने म्हटले 'अशा प्रतिभावान टीमसोबत काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. या चित्रपटात नातेसंबंध, विवाह यांवर एक अनोखा विचार आहे आणि चित्रपट प्रेक्षकांना पाहावा यासाठी मी फार उत्सुक आहे. त्यानंतर तिने पुढे म्हटले, यापूर्वी लुका छुपी आणि मिमी यासारखे हिट चित्रपट दिले आहे'.
मनोरंजक चित्रपट : या चित्रपटाबद्दल बोलतांना दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी म्हटले, 'हा चित्रपट माझ्या हृदयाच्या जवळ आहे. ही एक कथा आहे जी प्रेक्षकांना आवडेल. हा एक परिपूर्ण कौटुंबिक घडामोडीचा चित्रपट आहे जो तुमचे संपूर्ण मनोरंजन करण्याचे वचन देतो. तसेच यानंतर निर्माते दिनेश विजन यांनी चित्रपटाबद्दल म्हटले, 'माझा लक्ष्मणच्या भावना समजून घेण्याच्या जन्मजात क्षमतेवर विश्वास आहे. 'जरा हटके जरा बचके', योग्य भावनेसह, केवळ मनोरंजनच नाही तर लोकांच्या मनातही गुंजेल. लुका छुपी आणि मिमी, याप्रमाणेच हा चित्रपट देखील आहे. सर्व वयोगटातील प्रेक्षकांशी हा चित्रपट जोडला जाणारा आहे. हे एक परिपूर्ण मनोरंजन आहे ज्याचा कुटुंबे एकत्र आनंद घेऊ शकतात. तसेच 'जरा हटके जरा बचके'मध्ये राकेश बेदी आणि इनाममुलहक यांच्याही प्रमुख आहेत.
हेही वाचा :