ETV Bharat / entertainment

Dunki vs Salaar : शाहरुख खान आणि प्रभासच्या चाहत्यांमध्ये झाला वाद ; 'डंकी' आणि 'सालार' होणार एकाच दिवशी प्रदर्शित - शाहरुख आणि प्रभासच्या चाहत्यांमध्ये झाला वाद

Dunki vs Salaar : शाहरुख खान स्टारर 'डंकी' आणि प्रभासचा 'सालार' चित्रपट एका दिवशी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहेत. आता रिलीजपूर्वीच किंग खान आणि प्रभासचे चाहते सोशल मीडियावर या चित्रपटासाठी वाद करताना दिसत आहेत. अनेकजण पोस्ट शेअर करून 'डंकी'चं समर्थन करताना दिसत आहेत.

Dunki vs Salaar
डंकी vs सालार
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 2, 2023, 4:32 PM IST

मुंबई - Dunki vs Salaar : चित्रपटसृष्टीतील दोन सुपरस्टार शाहरुख खान आणि प्रभास यांच्या चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे. प्रभासचा 'सालार' आणि शाहरुख खानचा 'डंकी' 22 डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. दरम्यान शाहरुख आणि प्रभासचे चाहते या तारखेची वाट खूप आतुरतेनं पाहत आहेत. या दोन्ही स्टार्सच्या चाहत्यांमध्ये सध्या खळबळ उडाली आहे. 2 नोव्हेंबरला शाहरुखनं वाढदिवसानिमित्त त्याच्या बहुप्रतीक्षित चित्रपट 'डंकी'चा टीझर रिलीज केला आहे. सोशल मीडियावर शाहरुख आणि प्रभासच्या चाहत्यांमध्ये वॉर पाहायला मिळत आहेत. शाहरुख खानचा हा चित्रपट 'सालार'समोर कुठेही टिकणार नसल्याचं प्रभासचे चाहते सांगत आहेत. यावर आता किंग खानचे चाहते चिडले आहेत.

'डंकी' आणि 'सालार'मध्ये टक्कर : शाहरुख खानच्या चाहत्यानं एक्सवर 'डंकी'च्या टीझरमधील एक क्लिप शेअर करत लिहलं, 'हा सीन 'सालार'साठी पुरेसा आहे'. त्यानंतर एक्स यूजरनं लिहलं 'डंकी'चा टीझर पाहिला, मी गंभीरपणे विचार करत आहात की 'डंकी' प्रभासच्या 'सालार'समोर उभा राहू शकेल? मी पूर्ण विश्वासानं सांगू शकतो की प्रभास बॉक्स ऑफिसवर राज्य करणार आहे'. त्यानंतर शाहरुख खानचा एक चाहत्यानं लिहलं, 'मी निश्चितपणे म्हणू शकतो की 'डंकी' हा सिनेमाचा उत्कृष्ट ठरेल, आम्हाला या चित्रपटाचा टीझर हा खूप आवडला आहे' याशिवाय दुसऱ्या एका चाहत्यानं लिहलं 'डंकी' चित्रपटाला 10 पैकी 10 दिले पाहिजे. 2023 हे किंग खानचं आहे' अशा अनेक कमेंट सध्या प्रभास आणि शाहरुखचे चाहते करत आहेत.

  • After watching #Dunki teaser 😂.

    It's confirm that 2018 scenario will repeat itself #Salaar will thrash #Dunki left right .

    2023 highest opening and gross film will be under Rebelstar foot 💥🦖.pic.twitter.com/wYNLxBl3tY

    — 𝐁𝐚𝐡𝐮𝐛𝐚𝐥𝐢 𝐕𝐢𝐫𝐚𝐭 ™ #𝐒𝐚𝐥𝐚𝐚𝐫 🗡️ (@Super_V_18) November 2, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'डिंकी'मध्ये दिसेल किंग खानची रोमँटिक शैली : 'डंकी' चित्रपटामध्ये शाहरुख खान व्यतिरिक्त तापसी पन्नू, विकी कौशल, बोमन इराणी, दिया मिर्झा आणि आणखी काही कलाकार दिसणार आहेत. हा चित्रपट 'डंकी फ्लाइट' बेकायदेशीर इमिग्रेशन तंत्रावर आधारित आहे. 'जवान' आणि 'पठाण'मध्ये चाहत्यांनी शाहरुख खानला अ‍ॅक्शन मोड पाहिला आहे. आता 'डिंकी'मध्ये किंग खान हा चाहत्यांना रोमँटिक शैलीमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक खूप आतुरतेनं वाट पाहत आहेत. दुसरीकडे प्रभासचा 'सालार' सध्या प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटाकडून त्याला अपेक्षा आहेत. कारण त्याचा 'आदिपुरुष' बॉक्स ऑफिस खूप वाईटरित्या फ्लॉप झाला होता, त्यामुळं तो 'सालार' चित्रपटाद्वारे यांची नक्कीच भरापाई भरून काढेल.

हेही वाचा :

  1. Nick and Priyanka : निक जोनासनं प्रियांका चोप्राचा फोटो शेअर करत 'जस्ट लुकिंग लाइक अ व्वा' ट्रेंड केला फॉलो
  2. Shah Rukh Khan's birthday:'जवान' दिग्दर्शक अ‍ॅटलीनं शाहरुख खानला वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा; म्हटलं लव्ह यू सर...
  3. Varun and lavanya marriage : चिरंजीवी आणि नागा बाबू यांनी सोशल मीडियावर वरुण तेज आणि लावण्याच्या लग्नाची फोटो केली शेअर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.