हैदराबाद - अभिनेत्री रश्मिका मंदान्नाने हैदराबादमध्ये 'बेबी' या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला हजेरी लावली. या चित्रपटात विजय देवराकोंडाचा भाऊ आनंद मुख्य भूमिका साकारत आहे. अभिनेत्री वैष्णवी चैतन्यसोबत आनंदची जोडी आहे. रश्मिकाने 'बेबी'च्या प्रीमियरला तिचा कथित प्रियकर विजय देवराकोंडासह हजेरी लावली होती. चित्रपट पाहून झाल्यानंतर रश्मिका भावूक झाल्याचे पाहायला मिळाले आणि तिने थम्सअप साईन दिले. हैदराबादमधील थिएटरमध्ये पापाराझींनी तिला कॅमेऱ्यात कैद केले.
थिएटरमधून बाहेर पडताना रश्मिकाच्या भोवती सुरक्षा रक्षकांचे कडे पाहायला मिळाले. पापाराझींनी तिला जेव्हा चित्रपट कसा आहे असे विचारले तेव्हा तिने थम्सअप साईन करुन सिनेमा उत्तम असल्याचे सांगितले. या मुव्ही डेटनाईटसाठी रश्मिकाने साधे कपडे परिधान केले होते. विजय देवराकोंडाचा भाऊ आनंदसोबत रश्मिकाची चांगली मैत्री आहे. तिने आता पर्यंत आनंदच्या सर्व चित्रपटांना पाठिंबा दर्शवला असून ती यापूर्वी प्रीमियरलाही हजर राहिली होती. एवढंच नाही तर 'प्रेमीस्थुना' या गाण्यामध्ये रश्मिकाने आनंदसोबत एकत्र कामही केले आहे.
-
Cutiee #RashmikaMandanna got emotional post watching #BabyMovie in Hyderabad@iamRashmika pic.twitter.com/xKTS6OXzOj
— ARTISTRYBUZZ (@ArtistryBuzz) July 13, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Cutiee #RashmikaMandanna got emotional post watching #BabyMovie in Hyderabad@iamRashmika pic.twitter.com/xKTS6OXzOj
— ARTISTRYBUZZ (@ArtistryBuzz) July 13, 2023Cutiee #RashmikaMandanna got emotional post watching #BabyMovie in Hyderabad@iamRashmika pic.twitter.com/xKTS6OXzOj
— ARTISTRYBUZZ (@ArtistryBuzz) July 13, 2023
विजय देवराकोंडा चित्रपट पाहात असतानाचाही एक फोटो आहे. त्याने या चित्रपटाच्या रिलीजसाठी सदिच्छाही आनंदला दिल्या आहेत. चित्रपटानंतर पत्रकारांशी बोलताना विजय म्हणाला, ' 'बेबी' चित्रपटाबद्दल फार काही बोलावे असे मला वाटत नाही. सर्वांत पहिल्यांदा हा चित्रपट प्रीमियर पाहण्यासाठी जे लोक आले त्या सर्वांचे मी आभार मानतो. थिएटरमध्ये चित्रपट पाहताना आनंद, विराज आणि वैष्णवीसह मलाही रडू कोसळले होते.' 'बेबी' हा चित्रपट साई राजेश याने दिग्दर्शित केला असून अभिनेता आनंद देवराकोंडा आणि वैष्णवी चैतन्य मुख्य भूमिकेत आहेत. यांच्या शिवाय नागबाबू, लिरीषा, कुसुमा देगलमारी, सात्विक आनंद, बबलू, सीता, मोनिका, कीर्तना असे इतर कलाकार आहेत. हा चित्रपट गीता आर्ट्स आणि मास मुव्ही मेकर्सने बनवला आहे.
रश्मिका मंदान्नाच्या आगामी चित्रपटाबद्दल सांगायचे तर ती 'पुष्पा २' या चित्रपटात अल्लु अर्जुन आणि 'अॅनिमल' चित्रपटात रणबीर कपूरसोबत झळकणार आहे.
हेही वाचा -
१. Ranbir Kapoor : रणबीर कपूरला चाहत्यांनी घेरले, सेल्फी घेतानाचा व्हिडिओ व्हायरल
२. Yrf Spy Universe: स्पाय युनिव्हर्ससाठी आदित्य चोप्राने आलिया भट्टची का केली निवड? जाणून घ्या
३. Yrf's Spy Universe : यशराजच्या स्पाय युनिव्हर्समध्ये आलिया भट्टची एंट्री...