मुंबई - आरआरआर स्टार राम चरण आणि त्याची पत्नी उपासना काही दिवसापूर्वी आई वडील बनले होते. त्यांनी ही गुड न्यूज आपल्या तमाम चाहत्यांना दिली होती. लग्नाच्या १२ वर्षानंतर त्यांच्या घरात पाळणा हलला आहे. दोघांना एक सुंदर कन्यारत्न प्राप्त झालंय. राम चरण आणि उपासना आई वडील झाल्याने संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. राम चरणचे वडील आणि मेगास्टार चिरंजीवी पहिल्यांदाच आजोबा झाल्यामुळे खूप आनंदी आहेत. आता रामचे चाहते त्याच्या सुंदर परीचा चोहरा पाहण्यासाठी उत्सुक आहेत. पण त्याआधी आज म्हणजेच ३० जूनला त्यांच्या परीचा नामकरण सोहळा होणार आहे. उपासनाने एक व्हिडिओ शेअर करून याबाबत माहिती दिली आहे.
चिंजीवीची प्रतिक्रिया - सुपरस्टार चिरंजीवीने नात जन्मल्यानंतर आपला आनंद व्यक्त करताना एक ट्विट केले होते. यात त्याने लिहिले होते की, मेगा प्रिन्सेसचे स्वागत करत आहे. तुझ्या आगमनाने मेगा परिवारातील लाखोंच्या सदस्यांमध्ये आनंद पसरला आहे. तुझ्या आमनाने आम्ही धन्य पावलो आहोत. आम्हाला आजी आजोबा बनवल्याबद्दल राम चरण आणि उपासनाचे आभार.
-
It’s a MEGA ceremony for the #MegaPrincess tomorrow. The baby is likely to be named during the event, by the mega power couple @alwaysramcharan and @upasanakonidela 🥳🥳#RamCharan #GameChanger #GlobalStarRamCharan pic.twitter.com/v072LP8oKp
— 𝐕𝐚𝐦𝐬𝐢𝐒𝐡𝐞𝐤𝐚𝐫 (@UrsVamsiShekar) June 29, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">It’s a MEGA ceremony for the #MegaPrincess tomorrow. The baby is likely to be named during the event, by the mega power couple @alwaysramcharan and @upasanakonidela 🥳🥳#RamCharan #GameChanger #GlobalStarRamCharan pic.twitter.com/v072LP8oKp
— 𝐕𝐚𝐦𝐬𝐢𝐒𝐡𝐞𝐤𝐚𝐫 (@UrsVamsiShekar) June 29, 2023It’s a MEGA ceremony for the #MegaPrincess tomorrow. The baby is likely to be named during the event, by the mega power couple @alwaysramcharan and @upasanakonidela 🥳🥳#RamCharan #GameChanger #GlobalStarRamCharan pic.twitter.com/v072LP8oKp
— 𝐕𝐚𝐦𝐬𝐢𝐒𝐡𝐞𝐤𝐚𝐫 (@UrsVamsiShekar) June 29, 2023
नामकरण सोहळ्याची जय्यत तयारी - राम चरण आणि उपासना यांच्या कन्येचा नामकरण सोहळा आज ३० जून रोजी हैदराबादमध्ये होणार आहे. असे सांगितले जात आहे की राम आणि उपासना यांनी त्यांच्या मुलीचे नाव ठरवले आहे आणि ते आज चाहत्यांमध्ये ते शेअर करू शकतात. या दरम्यान, उपासनाने या सोहळ्याच्या तयारीचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये घरात सजावटीचे काम सुरू आहे. त्याच बरोबर घरामध्ये फुलांनी भव्य सजावट केली जात आहे.
-
The Prep is On for #MegaPrincess Naming Ceremony Today ❤️@AlwaysRamCharan @upasanakonidela pic.twitter.com/wv3hanbtcW
— Trends RamCharan™ (@TweetRamCharan) June 30, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">The Prep is On for #MegaPrincess Naming Ceremony Today ❤️@AlwaysRamCharan @upasanakonidela pic.twitter.com/wv3hanbtcW
— Trends RamCharan™ (@TweetRamCharan) June 30, 2023The Prep is On for #MegaPrincess Naming Ceremony Today ❤️@AlwaysRamCharan @upasanakonidela pic.twitter.com/wv3hanbtcW
— Trends RamCharan™ (@TweetRamCharan) June 30, 2023
राजकुमारीचा चेहरा पाहण्यासाठी चाहते उत्सुक - २० जून रोजी दुपारी १.४९ वाजता राम आणि उपासना यांच्या मुलीचा जन्म झाला आणि त्यानंतर उपासनाने तिचा पती राम चरण आणि मुलीसोबतचा सुंदर फोटो शेअर करून चाहत्यांना आनंदाची मोठी संधी दिली. या जोडप्याने अद्याप त्यांच्या मुलीचा चेहरा चाहत्यांना दाखवलेला नाही.
हेही वाचा -
१. Zhzb Box Office Collection Day 28 : 'जरा हटके जरा बचके'ने 28 व्या दिवशी केली एक कोटींपेक्षा कमी कमाई
२. Chandramukhi 2 Release Date : गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार 'चंद्रमुखी 2'
३. Dharmendra Esha : वडिलांच्या माफीनाम्यानंतर मुलगी ईशाचे हृदयस्पर्षी उत्तर